शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

अफरातफर प्रकरणांची चौकशी थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2019 2:18 PM

धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या विकासकामांमध्ये विविध स्वरूपातील घोटाळे झाले. सन २०१० पासून आजतागायत अफरातफर व प्रशासकीय अनियमिततेची अशी १५० पेक्षा अधिक प्रकरणे जिल्हा परिषदेकडे दाखल आहेत. ही प्रकरणे निकाली निघून धडक कारवाई झाल्यास अनेक आजी-माजी सरपंच, तत्कालिन तथा विद्यमान ग्रामसेवकांसह काही अन्य प्रशासकीय अधिकारीही अडचणीत येऊ शकतात; मात्र बहुतांश प्रकरणांचा तपास थंडबस्त्यात असल्याने दोषींना अभय मिळत आहे.शासनस्तरावरून ग्रामीण भागाच्या विकासाकरिता राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसाठी प्राप्त झालेला निधी खर्च करित असताना जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींचे सरपंच आणि सचिवांनी संगणमतातून आर्थिक गैरव्यवहार केला. याप्रकरणी त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील नागरिकांनी पंचायत समित्यांकडे तक्रारी केल्या. तेथून जिल्हा परिषदेकडे तक्रारींच्या फाईल्स सादर करण्यात आल्या. असे असताना प्रत्यक्ष चौकशीस विलंब लागण्यासह पाच वर्षाचा कालावधी संपल्यानंतर सरपंच पदावरून पायऊतार होणे, ग्रामसेवकांच्या इतरत्र बदल्या होणे, चौकशी पथकास तपासकार्यात अपेक्षित सहकार्य न मिळणे आदी कारणांमुळे बहुतांश प्रकरणांमधील दोषींवर कारवाई तर झाली नाहीच; शिवाय शासकीय निधीत अफरातफर आणि प्रशासकीय अनियमिततेच्या प्रकरणांमध्ये वर्षागणिक वाढ होत गेली.प्राप्त माहितीनुासर, सन २०१० ते २०१९ या ९ वर्षाच्या कालावधीत शासकीय निधीत अफरातफरची ३०० पेक्षा अधिक प्रकरणे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागात दाखल झाली. त्यातील १५० च्या आसपास प्रकरणे निकाली काढून संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली; मात्र उर्वरित प्रकरणांवर ठोस कार्यवाही झाली नसल्याने गैरव्यवहार करणारे तत्कालिन व काही विद्यमान सरपंच, सचिवांना एकप्रकारे अभय मिळत असल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, विकासकामांकरिता दिल्या जाणाºया शासकीय निधीत अफरातफर झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्यास संबंधित सरपंचाकडून रकमेची वसूली करणे बंधनकारक आहे. विहित मुदतीत संबंधिताने गैरव्यवहाराची रक्कम अदा न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमातील कलम १७९ अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करून कारागृहात टाकणे किंवा मालमत्तेवर टाच लावून वसूली करण्याचे प्रावधान आहे.

पंचायत विभागाकडे दाखल अफरातफर प्रकरणांच्या चौकशीत शक्यतोवर विलंब केला जात नाही. काही प्रकरणे प्रलंबित असतील तर त्याकडेही विशेषत्वाने लक्ष दिले जाईल. शासकीय निधीत अफरातफर करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.- दीपक कुमार मीनामुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद