गुन्हे शाखा करणार खतसाठा प्रकरणाचा तपास

By Admin | Updated: May 28, 2014 23:37 IST2014-05-28T22:58:07+5:302014-05-28T23:37:38+5:30

दागडीया गोदामातील अवैध खतसाठा प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

Investigation in the case of fertilizer in the crime branch | गुन्हे शाखा करणार खतसाठा प्रकरणाचा तपास

गुन्हे शाखा करणार खतसाठा प्रकरणाचा तपास

वाशिम :दागडीया गोदामातील अवैध खतसाठा प्रकरणाचा तपास आता स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे. प्रभारी जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी हा निर्णय घैतला आहे. शहर पोलीसांच्या ढिसाळ कामगिरीमुळे हा निर्णय झाल्याचे आता बोलल्या जात आहे. शहरातील रहीवाशी विजयकुमार दागडीया यांचे पंचाळा फाटा व काटा रोडवर गोडाऊन आहेत. या गोडाऊन मध्ये कोरोमंडल कंपनीच्या खताचा मोठय़ा प्रमाणात साठा असल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाला मिळाली होती. त्यानुसार जिल्हा कृषी विकास अधिकारी सुर्यवंशी व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण यांच्या मार्गदशर्नात कृषी विभागाच्या पथकाने गोदामची तपासणी केली होती. सदर तपासणीत कृषी विभागाच्या पथकाला एक कोटी ६८ लाख ४ ५ हजार रुपए किमंतीचे ८८४ मेट्रिक टन खत आढळून आले होते. त्यामुळे जीवनावश्यक वस्तू कायदयानुसार व इतर अनेक कायदयान्वये वाशिम शहर पोलीसांनी विजयकुमार उर्फ महिंद्रा दागडीया व कोरोमंडल कंपनीच्या अधिकार्‍यांविरूध्द शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर परंतु या प्रकरणी आपला दोष नसुन आपल्याला अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी २७ मे रोजी सुनावणी ठेवली होती; परंतु काही तांत्रिक कारणामुळे यावर निर्णय होऊ शकला नाही. आता या प्रकरणी न्यायालयाने ३0 मे रोजी सुनावणी ठेवली आहे. त्यामुळे ३0 मे रोजी या प्रकरणी न्यायालय काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक तुषार पाटील यांनी या प्रकरणाचा तपास वाशिम पोलीसांकडुन काढून स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला आहे.

Web Title: Investigation in the case of fertilizer in the crime branch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.