शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

कृषी सेवा केंद्रांची तपासणी; दोषींचे परवाने निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 12:29 PM

दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.

लोकमत न्युज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात रासायनिक खताची साठेबाजी करून त्याची वाढीव दराने विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी कृषी विभागाला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत कृषी विभागाने जिल्हाभरात पडताळणी मोहिम सुरू केली आहे. या अंतर्गत दोषी आढळलेल्या कृषी सेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आला आहे.जिल्ह्यात कृषी विभागाने आवश्यकतेनुसार रासायनिक खते उपलब्ध केली होती. त्यात सवलतीच्या दरातील खतांचाही समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासण्याची शक्यताच नव्हती. तथापि, रब्बी हंगामातील पिके बहरत असताना उत्पादन वाढीसाठी या पिकांना खत देण्याची गरज निर्माण झाली होती. त्यात प्रामुख्याने युरिया या रासायनिक खताचा समावेश होता. जिल्हाभरातील शेतकरी या खताची मागणी करीत असताना काही भागांत शेतकऱ्यांना हे खत मिळणे कठीण झाले होते. शेतकºयांनी चौकशी केल्यानंतर कंपन्यांकडून खताचा पुरेशा प्रमाणात पुरवठा होत नसल्याचे कारण सांगण्यात येत होते. तर काही ठिकाणी खतांचा तुटवडा दाखवून निर्धारित मुल्यापेक्षा अधिक दराने खतांची विक्री शेतकºयांना करण्यात येत असल्याच्या तक्र ारी कृषी विभागाकडे करण्यात येत होत्या. या तक्रारींच्या पृष्ठभुमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी पंचायत समित्यांच्या कृषी अधिकाºयांसह सहाही तालुका कृषी अधिकाºयांना कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार जिल्हाभरात खतविके्रत्या कृषीसेवा केंद्रांची तपासणी मोहिम सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, तालुका कृषी अधिकाºयांनी सुरू केलेल्या तपासणीत दोन कृषीसेवा केंद्रांत नियमांचे उल्लंघन होत असल्याचे प्राथमिक पाहणीत निदर्शनास आले. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांच्या समक्ष या प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी संबंधित कृषीसेवा केंद्र संचालकांना बोलाविण्यात आले. त्यात कारंजा तालुक्यातील दोनद बु. येथील विठू माऊली कृषीसेवा केंद्रात नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. य२२ात पॉस मशीनमध्ये नमद असलेला साठा आणि शिल्लक असलेला साठा न जुळने, पॉस मशीनच्या आधारे विक्री न करता आॅफलाईन पद्धतीने जादा दराने खतविक्री करण्याचा प्रकार निदर्शनास आला. जिल्हा अधीक्षक अधिकाºयांच्या समक्ष झालेल्या सुनावणीत सदर कृषीसेवा केंद्र संचालकाचे उत्तर असमाधानकारक आढळल्याने सदर कृषीसेवा केंद्राचा परवाना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली. शेतकºयांनी न घाबरता तक्रारी कराव्यातशासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांची विक्री ही पॉस मशीनने आणि आॅनलाईन पद्धतीने करून त्याची माहिती कृषीसेवा केंद्रांनी ठेवणे आवश्यक आहे. तथापि, काही ठिेकाणी असा प्रकार होत नसल्याचे कृषी विभागाला आढळून येत आहे. तथापि, शेतकºयांनी तक्रारी केल्याशिवाय यावर कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे कोणत्याही कृषीसेवा केंद्रावर नियमांचे उल्लंघन करून शेतकºयांना खतांची विक्री करण्यात येत असल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कृषीसेवा केंद्राची तक्रार शेतकºयांनी कृषी विभागाकडे करावी, असे आवाहन अधीक्षक कृ षी अधिकाºयांनी केले आहे.

जिल्ह्यात शेतकºयांना युरिया खत मिळत नसल्याच्या, तसेच जादा दराने या खताची विक्री करण्यात येत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार कृषीसेवा केंद्रांची तपासणी करण्याच्या सुचना सर्व तालुकास्तरावर देण्यात आल्या आहेत. ही मोहिम पुढे सुरुच राहणार असून, नियमांच्या उल्लंघन प्रकरणी कारंजा तालुक्यातील एका कृषीसेवा केंद्राचा परवानाही रद्द करण्यात आला आहे.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी,वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिम