शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

मालेगावातील तोडफोडप्रकरणी ३0 आरोपींचा शोध सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 2:58 AM

मालेगाव: मालेगावातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणातील २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, ११ जानेवारीला अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

ठळक मुद्देगुन्हे दाखल तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव: मालेगावातील वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणातील २५ ते ३0 आरोपींचा शोध पोलिसांनी सुरू केला. दरम्यान, ११ जानेवारीला अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयात हजर केले असता, विद्यमान न्यायालयाने तीनही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.रेशन दुकानदार गणेश सत्यनारायण तिवारी (५0) रा. गाडगेबाबा नगर, मालेगाव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, इब्राहीम खान गुलाब खान यास रेशन कार्ड व आधार कार्ड मागितले असता, त्यांनी कार्ड अंगावर फेकून दिले. यावरून वाद निर्माण होताच इब्राहीम खान हे हाणामारीवर आले. तिवारी यांचा भाऊ वाद सोडविण्यास आला असता, इब्राहीम खान यांनी मोबाइलवरून ३0 ते ३५ साथीदारांना बोलावून तिवारी यांचा भाऊ, घरातील महिलांना लोखंडी पाइप, गज व काठय़ांनी मारहाण केली तसेच घरातील व दुकानातील साहित्याचे नुकसान केले. यावरून आरोपींविरुद्ध कलम ३0७, ३२४, ३२३, ४५२, १४३, १४७, १४८, १४९, ५0४,५0६, ४२७ भादंविनुसार गुन्हे दाखल करून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय गवई हे करीत आहेत. दुसर्‍या गटातील फिर्यादी इब्राहीम खान गुलाब खान (३७) रा. जामा मशीद मालेगाव यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले की रेशन धान्य आणण्यासाठी गेलो असता गणेश तिवारी यांनी आधारकार्ड आणल्याशिवाय माल देणार नाही, असे म्हटले. १0 ते १५ मिनिटात आधार कार्ड आणून देतो, रेशन धान्य द्या अन्यथा तुमची तक्रार करतो, असे दुकानदारास म्हटले असता तिवारी यांनी अश्लील शिवीगाळ करीत अपशब्द वापरला. यावरून वाद होताच, तिवारी यांनी हातातील चाकूने डोक्यावर हल्ला करून जखमी केले तसेच अन्य दोन भाऊ व इतरांनी जबर मारहाण करून गंभीर जखमी केले. या तक्रारीहून मालेगाव पोलिसांनी गणेश तिवारी, त्यांचे दोन भाऊ व इतर अन्य काही जणांविरुद्ध कलम ३२४, ३२३, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गजानन वाणी करीत आहेत. पोलीस प्रशासनातर्फे पोलीस कर्मचारी गणेश नानाभाऊ बोडखे (३0 वर्ष) यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये नमूद केले की ११ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घटनेतील आरोपींनी गणेश तिवारी, उमेश तिवारी, महेश तिवारी व गीताबाई तिवारी यांना लोखंडी पाइप, काठी व दगडांनी मारहाण करून जखमी केले. याबाबत पोलिसांनी दंगा करण्यापासून त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्या सर्वांनी गैरकायद्याची मंडळी जमवून शासकीय कामात अडथळा निर्माण केला तसेच खासगी वाहनांची तोडफोड केली. यावरून उपरोक्त  जमावातील आरोपींविरुद्ध कलम ३५३, ३३३, १८६, ३३६, १४३, १४७, १४८, १४९, ४२७ सहकलम ७ भादंविनुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश धोत्रे करीत आहेत.  दरम्यान, गैरकायद्याची मंडळी जमवून वाहनांची तोडफोड केल्याप्रकरणातील २५ ते ३0 आरोपींचा शोध मालेगाव पोलीेस घेत आहेत. दरम्यान, ३५३ कलमाखाली उमेर खान व अरबाज खान, तर ३0७ या कलमाखाली अकील खान अशा तिघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

टॅग्स :washimवाशिम