मोफत रजिस्टर वाटप योजनेतील घोटाळ्याची चौकशी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:48 IST2021-09-17T04:48:56+5:302021-09-17T04:48:56+5:30
निवेदनात असे नमूद आहे की, देण्यात आलेल्या मोफत रजिस्टर वाटप योजनेचा आशा सेविकांना मोफत लाभ न देता, त्यांच्याकडून साधारणत: ...

मोफत रजिस्टर वाटप योजनेतील घोटाळ्याची चौकशी करा!
निवेदनात असे नमूद आहे की, देण्यात आलेल्या मोफत रजिस्टर वाटप योजनेचा आशा सेविकांना मोफत लाभ न देता, त्यांच्याकडून साधारणत: एका रजिस्टरचे १००० ते १२०० रुपये वसूल करण्यात आले. या वसुलीची कुणीही तक्रार करू नये, याकरिता आशा सेविकांवर दबाव आणला जात असून त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. आम्ही करू तोच कायदा... या धोरणाचा अवलंब करून, झालेला कथित घोटाळा दाबून टाकून घोटाळेबाजांना अभय देण्याच्या प्रयत्नात प्रशासन आहे. या गंभीर प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासोबतच संबंधीत विभागातील रेकॉर्डला छेडछाड होणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. या प्रकरणाच्या तात्काळ चौकशीच्यावेळी निवेदनकर्त्यांसह सर्व संबंधीतांना पाचारण करून उपस्थित राहण्याची मुभा द्यावी. अन्यथा मनसेच्यावतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.