गणेश मंडळाकडून राष्ट्रीयएकात्मतेचा परिचय
By Admin | Updated: September 4, 2014 00:25 IST2014-09-04T00:20:01+5:302014-09-04T00:25:52+5:30
वाशिम येथील छावा गणेश मंडळाने रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक एकात्मता निर्माण करण्याची स्तुत्य उपक्रम.

गणेश मंडळाकडून राष्ट्रीयएकात्मतेचा परिचय
वाशिम : स्थानिक छावा गणेश मंडळाने रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक एकात्मता निर्माण करण्याची स्तुत्य कामगिरी केली आहे. मंडळाच्या वतीने सोमवार १ सप्टेंबर रोजी आयोजित रक्तदान शिबिरात मुसळधार पावसतही हिंदू, मुस्लिम युवकांनी उत्साहाने सहभागी होत रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय दिला.
छावा गणेश मंडळाच्यावतीने १ सप्टेंबर रोजी शिवाजी चौकात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. भर पावसात आयोजित या रक्तदान शिबिरात हिंदू, मुस्लिम युवकांनी उत्साहाने सहभाग घेऊन रक्तदान केले. लोकमान्य टिळकांच्या प्रतिममेच पुजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. नगराध्यक्षा लताताई उलेमाले, जिल्हा शल्यचिकित्सक एस. के. मेंढे, तसेच वाहतूक निरीक्षक पवार यांनी रक्तदानाचे तहत्त्व विषद केले. अबरार मिर्झा यांनीही छावा गणेश मंडळाच्या रक्तदान शिबिर उ पक्रमाबाबत समाधान व्यक्त करून हिूदू, मुस्लिम एैक्य टिकविण्यासाठी अशा कार्यक्रमांचे आयोजन आवश्यक असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात एकूण ३५ बाटल्या रक्त संकलित करून ते शासकीय रक्तपेढीकडे पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. के. मेंढे यांनी केले. हिंदू, मुस्लिम युवकांनी उत्साहात रक्तदान करून राष्ट्रीय एकात्मतेचा परिचय दिला.
कार्यक्रमाचे संचालन मनिष डांगे यांनी, तर आभार प्रदर्शन सचिन सातव यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अंकूर गोटे, बेबी पडघान, वंदना अक्कर, अशोक गायकवाड, संतोष घुगे, पांडू भालेराव दिनेश बांगर, मनिष अग्रवाल, दिपक पानझाडे, संतोष चौधरी आदिंनी परीश्रम घेतले. छावा गणेश मंडळाच्या या उपक्र माचे नागरिकांकडून कौतूक करण्यात येत आहे.