किन्हीराजात इंटरनेट सेवा ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:12+5:302021-04-06T04:40:12+5:30
0000000 खड्डे बुजविल्याने वाहतूक सुरळीत वाशिम : पुसद नाका ते पोस्ट ऑफिस चौक या मुख्य रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविण्याचे ...

किन्हीराजात इंटरनेट सेवा ठप्प
0000000
खड्डे बुजविल्याने वाहतूक सुरळीत
वाशिम : पुसद नाका ते पोस्ट ऑफिस चौक या मुख्य रस्त्यावरील खड्डे डांबराने बुजविण्याचे काम शनिवारी करण्यात आले. यामुळे वाहतूक सुरळीत झाली आहे.
00000000000
रेतीअभावी रखडली शौचालयाची कामे
वाशिम : जिल्ह्यात तीन हजार शौचालयाचे बांधकाम ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश होते; मात्र रेतीच उपलब्ध नसल्याने बहुतांश कामे रखडली आहेत.
00000000000
नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
वाशिम : येथून पुसदकडे जाणाऱ्या मार्गावर पोलिसांनी रविवारी खडा पहारा देऊन नियम तोडणाऱ्या वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. यात विशेषत: हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनधारकांचा समावेश होता. ही प्रक्रिया यापुढेही सुरूच राहणार असल्याची माहिती शहर वाहतूक विभागाचे निरीक्षक नागेश मोहोड यांनी दिली.
00000000000
कृषी विभागाकडून महिलांना प्रशिक्षण
मेडशी : मधुमक्षिका पालन व्यवसायातून दारिद्र्यरेषेखालच्या कुटुंबातील महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उद्देश बाळगण्यात आला. याअंतर्गत कृषी विभागाकडून येथे शुक्रवारी महिलांना मधुमक्षिका पालनाचे प्रशिक्षण देण्यात आले.
0000000000