शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

भाजपात अंतर्गत धुसफूस; वंचित आघाडीत इच्छूकांची गर्दी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 15:22 IST

वंचित बहुजन आघाडीतून इच्छूकांची अनेक नावे समोर येत असल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.

- निनाद देशमुख लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : आगामी विधानसभा निवडणुकीचे वारे वाहायला सुरूवात होत नाही; तोच भाजपाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षांसह अन्य पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारल्याने अंतर्गत धुसफूस समोर आली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीतून इच्छूकांची अनेक नावे समोर येत असल्याने रिसोड विधानसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे.पूर्वाश्रमीचा मेडशी विधानसभा मतदारसंघ आणि २००९ मधील मतदारसंघ पुनर्रचनेनंतर अस्तित्वात आलेल्या रिसोड विधानसभा मतदारसंघात १९९९ आणि २००४ चा अपवाद वगळता उर्वरीत निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. मेडशी विधानसभा मतदारसंघ असताना, १९६७ ते १९९५ अशा एकूण सात निवडणुकीत काँग्रेसनेच विजय मिळविला.१९९९ आणि २००४ मध्ये भाजपाचे अ‍ॅड. विजय जाधव हे विजयी झाले होते. २००९ मध्ये रिसोड विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर सलग तीनही निवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला. २०१९ मधील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून, इच्छूकांनी मोर्चेबांधणीही सुरू केली. नेमके याच वेळी भाजपाच्या ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष वामन सानप यांच्यासह भाजपा ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी आमदाराच्या कार्यपद्धतीवर आरोप करीत भाजपा जिल्हाध्यक्षांकडे राजीनामे सोपविले. सदर राजीनामे अद्याप मंजूर झाले नसले तरी या प्रकारामुळे शिस्तीचा पक्ष म्हणून ओळख असलेल्या भाजपातील अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. सदर प्रकरण भाजपाचे वरिष्ठ नेते नेमके कसे हाताळतात यावर पुढील चित्र अवलंबून राहणार आहे. सलग तीन निवडणुकीतील भाजपाचा पराभव आणि आता अंतर्गत धुसफूस पाहता या मतदारसंघावर दावा करण्यासाठी शिवसेनेकडून वेगवान हालचाली सुरू झाल्या आहे. शिवसंग्रामनेही या मतदारसंघावर यापूर्वीच दावा केला आहे.दुसरीकडे काँग्रेसकडून विद्यमान आमदार अमित झनक तसेच माजी खासदार अनंतराव देशमुख यांचे पूत्र अ‍ॅड. नकूल देशमुखही विधानसभेसाठी इच्छूक आहेत. काँग्रेसच्यावतीने झनकांनाच उमेदवारी दिल्यानंतर नकुल देशमुख कोणता पवित्रा घेणार, हे सध्यातरी सांगता येत नसले तरी अद्याप कोणत्याही पक्षाकडे त्यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न केला नसल्याचे राजकीय चर्चेवरून दिसून येते.वंचित आघाडीही चर्चेतरिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीही चर्चेत आहे. लोकसभा निवडणुकीत रिसोड विधानसभा मतदारसंघात वंचित आघाडीला भाजपानंतर दुसºया क्रमांकाची मते होती. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी जानकीराम डाखोरे, डॉ. गजानन हुले, किरणताई गिºहे, प्रा. प्रशांत गोळे, डॉ. प्रल्हाद कोकाटे यांच्यासह इतरही काही जण इच्छूक आहेत. विश्वसनीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मुरब्बी नेताही वंचित आघाडीच्या संपर्कात आहे. तिकिटासाठी दोन वेळा त्यांनी वरिष्ठांची भेटही घेतली.

टॅग्स :RisodरिसोडwashimवाशिमPoliticsराजकारणVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडीBJPभाजपा