शेतकºयांना साडेपाच कोटींची व्याज सवलत !
By Admin | Updated: May 1, 2017 13:48 IST2017-05-01T13:48:12+5:302017-05-01T13:48:12+5:30
जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकºयांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ५ कोटी ४४ लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली.

शेतकºयांना साडेपाच कोटींची व्याज सवलत !
वाशिम - वेळेच्या आत पीककर्जाच्या रकमेचा भरणा करणाऱ्या जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत ५ कोटी ४४ लाख रुपयांची व्याज सवलत देण्यात आली.
खरिप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्जाचा लाभ दिला जातो. १ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जात नाही. मात्र, या कर्जाची परतफेड ३१ मार्चपूर्वी करणे बंधनकारक आहे. एक लाख रुपयांच्या वर पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेतर्फे व्याज आकारले जाते. विहित मुदतीत पीककर्जाच्या रकमेची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत व्याज सवलत दिली जाते. या योजनेंतर्गत गतवर्षी पीककर्ज काढलेल्या शेतकऱ्यांना यावर्षी व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात आला. जिल्ह्यातील ३५ हजार ६१४ शेतकऱ्यांनी विहित मुदतीच्या आत पीककर्जाची परतफेड केल्याने या शेतकऱ्यांना व्याज सवलत योजनेचा लाभ देण्यात आला. व्याज सवलतीची ही रक्कम ५ कोटी ४४ लाख रुपयांच्या घरात जाते.