आंतरजिल्हा बदली अर्जाला मुदतवाढ !
By Admin | Updated: May 18, 2017 14:30 IST2017-05-18T14:30:28+5:302017-05-18T14:30:28+5:30
प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याला मुदतवाढ मिळाली.

आंतरजिल्हा बदली अर्जाला मुदतवाढ !
वाशिम : प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सादर करण्याला मुदतवाढ मिळाली असून, १९ मे पर्यंत आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. यापूर्वी १२ मे ही अंतिम मुदत होती.
गत काही वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बंद असल्याने शिक्षकांना विविध गैरसोयींना सामोरे जावे लागले. आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरणी शासनाने २४ एप्रिल २०१७ अन्वये सुधारीत धोरण निश्चित केले. त्यानुसार इच्छूक शिक्षकांना संबंधित पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत. सुरूवातीला विभागनिहाय जाहिर केलेल्या वेळापत्रकात त्यानंतर काही बदल करण्यात आले. नवीन बदलानुसार अमरावती विभागातील इच्छूक शिक्षकांना ८ मे ते १२ मे या दरम्यान संबंधित गटशिक्षणाधिकारी कार्यालयात आॅनलाईन अर्ज सादर करावे लागले. मुदतवाढ देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून झाल्याने १९ मे पर्यंत आॅनलाईन अर्जाला मुदतवाढ देण्यात आली. जिल्ह्याभरातील सहाही पंचायत समिती स्तरावरील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात १९ मे पर्यंत इच्छूक शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीसाठी आॅनलाई अर्ज सादर करता येतील, अशी माहिती शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली.