मातृ सुरक्षेसाठी एकात्मिक बालविकास योजना ठरली ‘संजीवनी’

By Admin | Updated: July 10, 2014 01:52 IST2014-07-10T01:49:28+5:302014-07-10T01:52:08+5:30

शुभसंकेत : वाशिम जिल्ह्यातील कुपोषित बालकांच्या आकडेवारीत घट.

Integrated child development scheme for mother protection is 'Sanjivani' | मातृ सुरक्षेसाठी एकात्मिक बालविकास योजना ठरली ‘संजीवनी’

मातृ सुरक्षेसाठी एकात्मिक बालविकास योजना ठरली ‘संजीवनी’

योगेश यादव / कारंजा लाड
ह्यमातृत्व लाभणेह्ण हा महिलेसाठी एक सर्वांगसुंदर प्रसंग आहे. हा प्रसंग सुखद व्हावा, याकरिता गर्भावस्थेत महिलांना योग्य मार्गदर्शन आणि सकस आकाराची आवश्यकता असते. या अनुषंगाने केंद्र शासनाची एकात्मिक बालविकास सेवा योजना मागील २५ वर्षापासून तालुक्यात ह्यमातृसुरक्षेह्ण चे कल्याणकारी कार्य करीत असल्याने कुपोषित बालकांच्या आकडेवारीत लक्षणीय घट आल्याचे शुभसंकेत मिळत आहे.
येथील पंचायत समिती अंगणवाडी सेविकेच्या माध्यमातून तालुक्याच्या ग्रामीण भागात १९८९ पासून एकात्मिक बालविकास सेवा योजना राबवित आहे. या योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका गावातील गर्भवती महिलेची नोंद घेऊन ती पंचायत समितीपर्यंत पोहोचवितात. त्यानुसार तिसर्‍या महिन्यापासून आठव्या महिन्यापर्यंत गर्भवती महिलांना साधारणपणे दोन महिन्यातून सुकळी, शिरा, उपमा असा जीवनावश्यक आहार दिला जातो. ज्याला ह्यटीएचआरह्ण म्हटले जाते. याशिवाय आरोग्य विभागाच्या वतीने गर्भवती महिलांच्या रक्ताची तपासणी करण्यात येऊन त्यांना लोहयुक्त गोळ्यांचे मोफत वितरण केल्या जाते; तसेच या योजनेंतर्गत गर्भवती महिलांसाठी समुपदेशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. ज्यामध्ये आहार, गर्भावस्थेत आवश्यक असलेली काळजी आणि उपचार यासंदर्भात विस्तृत माहिती देण्यात येते.
बाळाचा जन्म झाल्याबरोबर त्याला अध्र्या तासाच्या आत आईचे दूध प्यायला द्या, त्याच्या नाभिवर कोणतीही वस्तू लावू नका, लसीकरणाबाबत काळजी घ्या अशाप्रकारचे मार्गदर्शन गर्भवती महिलांना करण्यात येते. विशेष म्हणजे गर्भावस्थेतील आठव्या महिन्यात महिलेस ७00 रूपये देण्याचे प्रावधान या योजनेत आहे. परिणामी ग्रामीण भागासाठी ही योजना ह्यसंजीवनीह्ण चे काम करीत आहे. केंद्र शासनाची एकात्मिक बालविकास सेवा योजना समाजातील सर्व घटकांसाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून गर्भवती महिलांना योग्य मार्गदर्शन, सकस आहार, वैद्यकीय चिकित्सा आणि औषध मिळत असल्याने निरोगी बाळाला जन्म देण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी कुपोषणाच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, ही वस्तुस्थिती आहे.

Web Title: Integrated child development scheme for mother protection is 'Sanjivani'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.