शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अग्निशमन यंत्रणेसंदर्भात रुग्णालयांची तपासणी करण्याचे निर्देश !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 6:42 PM

Washim News इलेक्ट्रिक आॅडीट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

वाशिम : भंडारा जिल्हा रुग्णालयातील दुर्देवी घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी १२ जानेवारी रोजी जिल्ह्यातील सर्व नगर परिषद, नगर पंचायतच्या मुख्याधिकारी व आरोग्य विभागाचा आढावा घेतला. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा तसेच इतर आवश्यक बाबींची तपासणी करीत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी मुख्याधिकारी व आरोग्य विभागाला दिले.बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, नगररचना विभागाचे सहाय्यक संचालक प्र. कि. दांदळे, आयएमएचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांच्यासह मुख्याधिकारी, अग्निशमन अधिकाºयांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी खबरदारी घेणे आवश्यक आहे. रुग्णालयांच्या इमारतींमध्ये बिल्डींग कोडनुसार अग्निशमन यंत्रणा, इमर्जन्सी एक्झिट यासारख्या आवश्यक बाबी आहेत की नाही, यासंदर्भात नगरपरिषदेने कालबद्ध मोहीम राबवून तपासणी करावी. आरोग्य विभागाने सुद्धा जिल्ह्यातील रुग्णालयांची तपासणी करून बॉम्बे नर्सिंग होम अ‍ॅक्ट अंतर्गत नोंदणीसाठी सादर केलेल्या कागदपत्रांसह उपलब्ध आवश्यक सुविधांची तपासणी करावी. नगरपरिषद व आरोग्य विभागाने यापुढे प्रत्येक वर्षी सहा-सहा महिन्याने अशाप्रकारे रुग्णालयांची नियमित तपासणी करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रांसह जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालयांमधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत असल्याची खात्री करावी. तसेच कर्मचाऱ्यांना याविषयी आवश्यक प्रशिक्षण द्यावे. वर्षातून किमान एकदा सर्व शासकीय रुग्णालये, खासगी रुग्णालये येथे अग्निशमन यंत्रणेच्या वापराबाबत ‘मॉक ड्रील’ घ्यावी. सर्व शासकीय रुग्णालयांचे फायर आॅडीट व इलेक्ट्रिक आॅडीट लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.

टॅग्स :washimवाशिमhospitalहॉस्पिटल