झोडगा-उंबर्डा रस्त्याची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:26 IST2021-02-05T09:26:18+5:302021-02-05T09:26:18+5:30
------------------ हातपंप महिनाभरापासून बंद उंबर्डा बाजार : येथील बसथांबा परिसरात असलेला हातपंप महिनाभरापूर्वी नादुरुस्त झाला. त्यामुळे या हातपंपावर अवलंबून ...

झोडगा-उंबर्डा रस्त्याची पाहणी
------------------
हातपंप महिनाभरापासून बंद
उंबर्डा बाजार : येथील बसथांबा परिसरात असलेला हातपंप महिनाभरापूर्वी नादुरुस्त झाला. त्यामुळे या हातपंपावर अवलंबून असलेल्या ग्रामस्थांना अनियमित पाणीपुरवठ्याच्या वेळी पाण्यासाठी शिवारात पायपीट करावी लागत आहे. शिवाय वाटसरूंना तहान भागविण्यासाठी भटकंती करून उपाहारगृहांचा आधार घ्यावा लागत आहे.
-----------------
बचत गटांना कृषी विभागाचे मार्गदर्शन
उंबर्डा बाजार : आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना घरपोच बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्यासाठी कृषी विभागाने नियोजन केले आहे. यासाठी बचत गटांचा आधार घेतला जाणार आहे. यानिमित्त परिसरातील बचत गटांना कृषी विभागाकडून शुक्रवारी मार्गदर्शन करण्यात आले.
------------
पोहरादेवी परिसरात कोरोना चाचणी
पोहरादेवी : मानोरा तालुक्यातील ग्रामीण भागांत कोरोना संसर्गाचे रुग्ण पुन्हा आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला असून, कोरोना संसर्गावर नियंत्रणासाठी ग्रामस्थांच्या कोरोना चाचणीवर भर दिला जात आहे. यात तालुका आरोग्य विभागाने शनिवारी पोहरादेवी परिसरातील गावांत फिरून ग्रामस्थांची कोरोना चाचणी केली.