पालकमंत्र्यांकडून कोविड केअर सेंटरची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:18 AM2021-05-04T04:18:47+5:302021-05-04T04:18:47+5:30

मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत अधिग्रहित करून याठिकाणी कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी शण्मुगराजन ...

Inspection of Kovid Care Center by the Guardian Minister | पालकमंत्र्यांकडून कोविड केअर सेंटरची पाहणी

पालकमंत्र्यांकडून कोविड केअर सेंटरची पाहणी

Next

मालेगाव येथील ना. ना. मुंदडा विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयाची इमारत अधिग्रहित करून याठिकाणी कोविड केअर सेंटरला जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांच्या आदेशाने मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सुरु आहे. याविषयीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री देसाई यांनी या सेंटरला भेट दिली. याठिकाणी रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील, याची दक्षता घ्यावी. पुरेशा प्रमाणात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी तसेच औषधे उपलब्ध ठेवण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी केल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी,जिल्हा परिषद सभापती चक्रधर गोटे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, तहसीलदार रवी काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष बोरसे, मालेगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी विकास खंडारे, ना. ना. मुंदडा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्यामबाबू मुंदडा यांची उपस्थिती होती.

Web Title: Inspection of Kovid Care Center by the Guardian Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.