कुष्ठरुग्ण शोधमोहिमेंतर्गत ४.६३ लाख लोकांची तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 01:50 IST2017-09-15T01:49:45+5:302017-09-15T01:50:03+5:30

जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ११ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत १ हजार ४१ चमूंनी  जिल्ह्यातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येपैकी ४ लाख ६२ हजार ८९७ लोकांची तपासणी करण्यात आली असून, यात २ हजार ६८२ संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. 

Inspect 4.63 lakh people under leprosy search | कुष्ठरुग्ण शोधमोहिमेंतर्गत ४.६३ लाख लोकांची तपासणी

कुष्ठरुग्ण शोधमोहिमेंतर्गत ४.६३ लाख लोकांची तपासणी

ठळक मुद्देअडीच हजारांवर संशयित रुग्ण१ हजार ४१ चमूंनी दिल्या घरांना भेटी 

लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम: जिल्ह्यात ५ सप्टेंबरपासून कुष्ठरुग्ण शोध मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत ११ सप्टेंबरपर्यंतच्या कालावधीत १ हजार ४१ चमूंनी  जिल्ह्यातील ११ लाख १८ हजार ७४९ लोकसंख्येपैकी ४ लाख ६२ हजार ८९७ लोकांची तपासणी करण्यात आली असून, यात २ हजार ६८२ संशयित रूग्ण आढळले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. 
 केंद्र शासनाच्या कुष्ठरोग शोध अभियान कार्यक्रमांतर्गत राज्यातील २२  जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्याचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व तालुक्यात व निवडक शहरी भागातगेल्या ५ सप्टेंबरपासून कुष्ठरोग शोध अभियान राबविण्यात येत आहे. पंतप्रधान प्रगती योजनेमध्ये कुष्ठरोग कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे. या अभियानात झोपडपट्टी, जास्त कुष्ठरुग्ण असलेला भाग, बाल कुष्ठरुग्ण भाग, कुष्ठरोगाची विकृती असलेल्या भागात आशा स्वयंसेवक, अंगणवाडी सेविका, पुरुष स्वयंसेवक यांच्यामार्फत दररोज ग्रामीण भागात २0  घरांना व शहरी भागात २५ घरांना भेटी देऊन घरातील सर्व सदस्याची त्वचारोग विषयक तपासणी करण्यात येत आहे. पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर हे अभियान राबविण्यात येणार आहे. समाजातील लपून राहिलेले कुष्ठरुग्ण लवकरात लवकर व विना विकृती शोधून काढून त्यांना त्वरीत बहुविध औषधोपचाराखाली आणणे. नवीन सांसर्गिक कुष्ठरुग्ण शोधुन बहुविध औषधोपचाराखाली आणल्यामुळे संसगार्ची साखळी खंडीत होऊन रोगाचा होणारा प्रसार कमी करणे. कुष्ठरोग दुरीकरणाचे ध्येय साध्य करुन कुष्ठरोग निर्मुलनाच्या दिशेने वाटचाल करणे हा या अभियानाचा उद्देश आहे. वाशिम जिल्ह्यात कुष्ठरोग सर्वेक्षण आरोग्य प्रशिक्षण केंद्र नागपूरचे सहाय्यक संचालक तथा राज्यस्तरीय झोलन अधिकारी डॉ. विजय डोईफोडे,  वाशिमचे सहाय्यक संचालक डॉ. अश्‍विनकुमार हाके, अवैद्यकीय सहाय्यक जे. आर. ठाकरे, अवैद्यकीय पर्यवेक्षक ए. एस. लोणारे यांच्या मार्गदर्शनात वाशिम जिल्ह्यात कुष्ठरुग्ण शोध मोहीम आणि सर्वेक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, आरोग्य सेवकांसह सामाजिक संस्थाच्या प्रतिनिधींचा समावेश असलेल्या १ हजार ४१ चमूने जिल्ह्यातील १ लाख २ हजार ९१७ गावांना ११ सप्टेंबरपर्यंत भेटी देऊन ४ लाख ६२ हजार ८९७ लोकांची तपासणी केली. यामध्ये २ हजार ६८२ संशयित रूग्ण आढळून आले. त्यामध्ये कुष्ठरोगाची निश्‍चित लागण झालेले १0 रूग्ण आढळले असून, यात असांसर्गिक प्रकारातील ७, तर सासंर्गिक प्रकारातील ३ रुग्णांचा समावेश आहे. ही मोहिम येत्या २0 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

Web Title: Inspect 4.63 lakh people under leprosy search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.