जलमुक्त होळी खेळण्यासाठी पुढाकार

By Admin | Updated: March 24, 2016 02:44 IST2016-03-24T02:44:10+5:302016-03-24T02:44:10+5:30

‘लोकमत’च्या आवाहनाला वाशिम जिल्ह्यात प्रतिसाद; शासकीय कार्यालयांसह विद्यार्थीही सरसावले.

Initiative to play Holi Holi | जलमुक्त होळी खेळण्यासाठी पुढाकार

जलमुक्त होळी खेळण्यासाठी पुढाकार

शिखरचंद बागरेचा / वाशिम
अत्यल्प पावसाळा आणि त्यामुळे निर्माण झालेल्या भीषण पाणीटंचाईचे भान राखून पाण्याची नासाडी न करता 'जलमुक्त होळी' साजरी करण्याचे आवाहन 'लोकमत'ने केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रीय हरित सेनेसह मारवाडी युवा मंच व शालेय विद्यार्थ्यांनी रंगपंचमीला पाण्याची नासाडी न करण्याची शपथ घेतली व पाणी वाचविण्याकरिता 'जलमुक्त होळी' साजरी करण्याचे आवाहन इतरांनाही केले.
'लोकमत'ने जलमुक्त होळी साजरी करण्याचे आवाहन केल्यानंतर वाशिम येथील लायनेस क्लबच्यावतीने कार्यक्रम घेऊन जलमुक्त होळी साजरी करण्यासाठी घोषवाक्यांतून जनतेला आवाहन केले जात आहे. यावेळी क्लबच्या अध्यक्ष श्‍वेता बडजात्या, सचिव अर्चना डाळे, सदस्य कमला बगडिया, पूजा अग्रवाल, सोनल अग्रवाल, राकेश पटेल, रश्मी सेठी, माला वंजाणी यांच्या उपस्थितीत 'जलमुक्त होळी'खेळण्याची शपथ घेण्यात आली.
वाशिम येथील युवा क्रांती मंचच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी नीलेश सोमाणी, भारती सोमाणी, पवन मानधने, पूनम मानधने, सुनील कासट, पूजा कासट, जसराज केला, पूजा केला, निता कासट, पूनम कासट यांचा समावेश होता. वाशिम येथील जेसीआय क्लबच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण साजरी करण्याच्या ह्यलोकमतह्णच्या आवाहनाला प्रतिसाद देत जनजागृती कार्यक्रम घेतला. यावेळी सुनिल चांडक, पंकज बाजड, जितेंद्र बोडस, शैलेश सोमाणी, सौरभ गट्टाणी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. वाशिम येथील निसर्ग युवा मित्र मंडळ व के.के. गोटे मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २३ मार्च रोजी जलमुक्त होळी साजरी करण्याची शपथ घेण्यात आली. यावेळी दशरथ वाटाणे, के.के. गोटे, शंतनु खिराडे, स्वप्निल गव्हाळे, युवराज जाधव, सौरभ आहाळे, संतोष इढोळे, सागर खिल्लारे, सागर सोनुने, अरुण भगत, जे.डी. सर यांच्यासह अनेक जण उपिस्थत होते. वाशिम येथील स्वामी सर्मथनगर मंडळाच्यावतीने या भागातील युवकांची २३ मार्च रोजी बैठक झाली. ह्यलोकमतह्णने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची व याबाबत जनजागृती करण्याची शपथ यावेळी योगेश भोयर, मोहित जमधाडे, राम डाखोरे, प्रवीण शिंदे, गणेश अंदुरकर, विवेक दुबे, रोहित वाघ, चेतन जाधव, योगेश फाले, प्रदीप बडवे, प्रा. महेश तांदळे, प्रा. भास्कर भिसे, ऋषभ माळोदे, विशाल व्यवहारे, सुशील देशमुख यांनी घेतली. मारवाडी युवा मंचच्यावतीने ह्यजलमुक्त होळीह्ण खेळण्याची शपथ अमित वर्मा, सुमीत चांडक, मनीष मंत्री, सचिन करवा, पुनीत शर्मा, आशिष लढ्ढा, प्रेम अग्रवाल, संजोग छाबडा आदींनी घेऊन जनजागृती केली.

Web Title: Initiative to play Holi Holi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.