वाशिममध्ये गुरूवारपासून माहिती अधिकार मार्गदर्शन कार्यशाळा!

By Admin | Updated: April 4, 2017 19:06 IST2017-04-04T19:06:53+5:302017-04-04T19:06:53+5:30

यशदा, पुणेअंतर्गत तहसिल कार्यालयात दोन दिवस मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले.

Information Rights Guidance Workshop from Thursday in Washim! | वाशिममध्ये गुरूवारपासून माहिती अधिकार मार्गदर्शन कार्यशाळा!

वाशिममध्ये गुरूवारपासून माहिती अधिकार मार्गदर्शन कार्यशाळा!

वाशिम : माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत आयोजित माहिती अधिकार सप्ताहानिमित्त शहरात गुरूवार, ६ व शुक्रवार, ७ एप्रिल असे दोन दिवस माहिती अधिकार सल्ला केंद्र व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. माहिती अधिकार कायद्यास ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त केंद्रशासनाच्या ह्यडीओपीटीह्ण या विभागाकडून माहिती अधिकार अधिनियम या विषयावर जनजागरण कार्यक्रम घेण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या आहेत. त्यानुसार, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणेअंतर्गत तहसिल कार्यालयात दोन दिवस सल्ला केंद्र व एक दिवस मार्गदर्शन कार्यशाळा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Web Title: Information Rights Guidance Workshop from Thursday in Washim!