यू-डायस अपडेटमध्ये जिल्ह्यातील १२९५ शाळांनी भरली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:31 IST2021-05-30T04:31:13+5:302021-05-30T04:31:13+5:30

रिसोड : शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या यू-डायस अपडेटमध्ये राज्यामध्ये गोंदिया जिल्हा अव्वल असून, १०० टक्के शाळांनी माहिती भरली आहे. ...

Information filled in 1295 schools in the district in U-Dias update | यू-डायस अपडेटमध्ये जिल्ह्यातील १२९५ शाळांनी भरली माहिती

यू-डायस अपडेटमध्ये जिल्ह्यातील १२९५ शाळांनी भरली माहिती

रिसोड : शैक्षणिकदृष्ट्या अतिशय महत्त्वपूर्ण असलेल्या यू-डायस अपडेटमध्ये राज्यामध्ये गोंदिया जिल्हा अव्वल असून, १०० टक्के शाळांनी माहिती भरली आहे.

वाशिम जिल्ह्यामध्ये १२९५ शाळांनी माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली; तर १७ शाळांनी अद्यापही माहिती भरण्यास सुरुवात केली नाही.

राज्यातील सर्व शाळांची इत्यंभूत माहिती असणारे यू-डायस अपडेटमध्ये राज्यातील एकूण एक लाख दहा हजार ४९२ शाळांपैकी एक लाख सात हजार ७० शाळांनी यू-डायसची माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली; तर दोन हजार एकशे चार शाळाची माहिती भरणे सुरू आहे. १३१६ शाळांनी माहिती भरण्यास सुरुवात केली नाही. २९ मेच्या अहवालानुसार ही माहिती पुढे आली असून, यू-डायसवर शाळेची माहिती सादर करण्याची अंतिम दिनांक २९ मे हाेती. शाळांनी माहिती भरण्यामध्ये गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात प्रथम आहे. यामध्ये शंभर टक्के १६६३ शाळांनी माहिती भरली; तर पुणे जिल्ह्यात सर्वांत कमी शाळांनी माहिती भरली.

राज्यामध्ये यू-डायसवर माहिती भरण्याचे काम ९६.९० टक्के पूर्ण झाले आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये १२९५ शाळांनी माहिती भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली; तर १७ शाळांनी अद्यापही माहिती भरण्यास सुरुवात केलेली नाही.

Web Title: Information filled in 1295 schools in the district in U-Dias update

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.