सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST2021-09-10T04:50:24+5:302021-09-10T04:50:24+5:30

------------------- साथरोग नियंत्रणासाठी धूर फवारणी वाशिम : तालुक्यात हिवताप, सर्दी, खोकल्यासह विषाणूजन्य ताप आणि डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरली आहे. ...

Infestation of legume larvae on soybeans | सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव

सोयाबीनवर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादूर्भाव

-------------------

साथरोग नियंत्रणासाठी धूर फवारणी

वाशिम : तालुक्यात हिवताप, सर्दी, खोकल्यासह विषाणूजन्य ताप आणि डेंग्यूसदृश आजाराची साथ पसरली आहे. शासकीय आणि खासगी रुग्णालयांत उपचारासाठी रुग्णांची गर्दी होत आहे. या पृष्ठभूमीवर आरोग्य विभागाने शहर आणि ग्रामीण भागांतही साथरोग नियंत्रणासाठी धूर फवारणी सुरू केली आहे.

-------------------

९ प्रकल्पांची पातळी ३० टक्क्यांवरच

वाशिम : तालुक्यात पावसाची सरासरी शंभर टक्क्यांच्यावर पोहोचली असतानाही सार्वत्रिक आणि दमदार पावसाच्या अभावामुळे प्रकल्पांच्या पातळीत फारशी वाढ झाली नाही. अद्यापही ९ तालुक्यातील पावसाची पातळी ३० टक्क्यांवरच असून, एक बुर्जी या मध्यम प्रकल्पांसह तीन लघू प्रकल्प मिळून चार प्रकल्प शंभर टक्के भरले आहेत.

-------------------

मुलांच्या वसतिगृहात सुविधांचा अभाव

वाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शाळा, महाविद्यालये बंद असताना समाज कल्याण विभागांतर्गत मुलांच्या वसतिगृहाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून, जिल्ह्यातील वसतिगृहात सुविधांचा अभाव निर्माण झाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. याची दखल शासनाने घेण्याची मागणी होत आहे.

Web Title: Infestation of legume larvae on soybeans

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.