मंगरुळपीर शहरात दुषित पाणी
By Admin | Updated: April 22, 2017 13:27 IST2017-04-22T13:27:05+5:302017-04-22T13:27:05+5:30
वार्डामध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.

मंगरुळपीर शहरात दुषित पाणी
मंगरुळपीर : येथील वार्ड क्र.१० मध्ये अनियमित पाणीपुरवठा होत असुन तीन दिवसानंतर पाणी ऊपलब्ध होते पण तेही दुषीत असते त्यामुळे नगर परिषद मंगरुळपीर कडून नियमित आणी शुध्द पाणी पुरवठा होणेसाठी येथील आरिफ खान बिस्मिल्ला खान यांनी न.प.मुख्याधिकाऱ्यांना लेखी निवेदनाव्दारे मागणी केलेली आहे.
वार्डामध्ये नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना नाहक ञास सहन करावा लागत आहे.पंधरा दिवसातुन एखादेवेळी पाणी पुरवठा झाल्यास तेही सेप्टीक संडासचे पाणी मिस्ञीत होवुन पाणी पुरवठा होत आहे .अवैध नळ कनेक्शन देन्याच्या नादात काही न.प.कर्मचाऱ्यांनी चुकीच्या ठिकाणी पाईप लाईन फोडुन ठेवल्या आहेत.हि बाब प्रशासनाच्या वारंवार लक्षात आणुन देवूनही दखल घेतल्या गेली नाही त्यामुळे नियमित शुध्द पाणीपुरवठा होणेसाठी न.प.प्रशासनाने ऊपाययोजना करावी अशी मागणी होत आहे.