शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत मतमोजणी, अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाची मुसंडी, तर सिक्कीममध्ये SKM निर्विवाद वर्चस्वाच्या दिशेने 
2
"मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करेन, ४ जूनला एक्झिट पोल चुकीचे सिद्ध होतील"
3
आयकर विभागाचा मोठा छापा; हवाला व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांकडून २५ कोटींची रोकड, हिरे, सोनं जप्त
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा सरकार स्थापन करणार, बहुतांश एक्झिट पोलचा अंदाज
5
T20 WC 2024: ऑस्ट्रेलिया नाही! पण भारत फायनल खेळणार; 'युवी'ने सांगितला खेळ भावनांचा
6
व्हॉट्सॲपवरून ट्रिपल तलाक; पतीवर गुन्हा, पत्नीला धमकावल्याचा आरोप 
7
धक्कादायक! ११ प्रवाशांनी भरलेली बोट नदीत उलटली; ७ जणांचा बुडून मृत्यू, ४ जण बचावले
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - २ जून २०२४; यश, प्रतिष्ठा वाढेल, वरिष्ठ खूश असल्याने पदोन्नतीची शक्यता
9
नरेंद्र मोदींच्या तिसऱ्या टर्मला महाराष्ट्राची अपेक्षित साथ नाही !
10
उत्तरेत पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजप पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा
11
पश्चिम बंगालमध्ये भाजप तृणमूलला देणार धक्का, २०१९च्या तुलनेत सरस कामगिरी करणार
12
हिटमॅनचा फॅन मैदानात शिरला! अमेरिकेच्या पोलिसांनी इंगा दाखवला; रोहितही अवाक्, Video
13
अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगचे इटलीत सेलिब्रेशन
14
पंतप्रधान मोदींची ४५ तास ध्यान साधना, संतकवी तिरुवल्लुवर यांना वाहिली पुष्पांजली
15
जावई-सासऱ्यातील समेटासाठी मुलाचा आधार, संवाद साधण्याचा उच्च न्यायालयाचा सल्ला 
16
आजही अडचणींचा डोंगर, वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन
17
एमएचटी-सीईटीच्या चुकीच्या उत्तरांची दखलच नाही, एक प्रश्न अभ्यासक्रमाबाहेरील फॉर्म्युल्यावर आधारित 
18
भारतीय फलंदाजांनी निडरपणे खेळावे - सौरव गांगुली
19
नेपाळ, नेदरलँड्स देऊ शकतात धक्का : गिलख्रिस्ट 
20
अकरावी प्रवेशासाठी ५ जूनपासून पसंतिक्रम, पहिल्याच फेरीचेच वेळापत्रक जाहीर

वाशिम जिल्ह्यात औद्योगिक इंधनाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 06, 2022 4:49 PM

Industrial fuel stocks seized in Washim district : एका टिनशेडमध्ये औद्योगिक इंधन, वाहन असा १५.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.

वाशिम : बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री (इंडस्ट्रियल आॅईल) करण्याचा गोरखधंदा पोलिसांनी उघडकीस आणला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ४ फेब्रुवारी रोजी वाशिम ते केकतउमरा या मार्गावरील गोटे महाविद्यालयासमोरील एका टिनशेडमध्ये औद्योगिक इंधन, वाहन असा १५.९४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.पोलीस अधिक्षक बच्चन सिंह यांनी जिल्ह्याचा पदभार स्विकारल्यापासून गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा याकरीता जिल्ह्यात वेळोवेळी नाकाबंदी, कोम्बींगची मोहिम राबवून अवैध्य धंद्यांवर कारवाई, मालमत्तेच्या गुन्हयातील आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. बायो डिझेलच्या नावाने औद्योगिक इंधनाची विक्री होत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सिंह यांना मिळाल्याने, तातडीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांना खात्री करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता, एका टिनशेडमध्ये एमएच२८ बीबी ४९३९ क्रमांकाच्या वाहनातून औदयोगिक इंधन या नावाने बायोडिझेल बेकायदेशीररित्या इलेक्ट्रीक पाण्याची मोटार व पाईप लावुन टिनशेडमधील प्लास्टीक टाकीमध्ये उतरवित असताना आढळून आले. घटनास्थळी नमुद ७ इसमांना पंचासमक्ष ताब्यात घेऊन विचारपुस केली असता, त्यांच्याकडे औदयोगिक इंधन विक्री व साठवणुक करण्याबाबतचा कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. आरोपींकडुन अंदाजे सहा हजार लिटर औद्योगिक इंधनाचा साठा, एक टाटा वाहन व इतर साहित्य असा एकुण १५ लाख ९४ हजार २५० रुपयाचा मुददेमाल पंचासमक्ष जप्त केला. पुढील कारवाईसाठी तहसिलदारांना पत्रऔद्योगिक इंधनाचा साठा जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलीस विभागाने वाशिम तहसिलदार व पुरवठा निरिक्षक यांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. यांनी बजावली कामगिरीपोलीस अधिक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधिक्षक गोरख भामरे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद इंगळे, पोलीस उपनिरीक्षक पठाण यांच्यासह पोलीस कर्मचारी किशोर चिंचोळकर, राजेश गिरी, अमोल इंगोले, प्रशांत राजगुरु, संतोष शेणकुडे यांनी कारवाई केली.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी