मंगळवारपासून पॅसेंजर सुरू होण्याचे संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:47 IST2021-08-14T04:47:18+5:302021-08-14T04:47:18+5:30
............. वृक्षलागवडीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. काहीठिकाणी रस्ता काम ...

मंगळवारपासून पॅसेंजर सुरू होण्याचे संकेत
.............
वृक्षलागवडीकडे यंत्रणेचे दुर्लक्ष
वाशिम : वाशिम ते अनसिंग या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम केले जात आहे. काहीठिकाणी रस्ता काम पूर्णदेखिल झाले. असे असताना कापलेल्या वृक्षांची ठिकाणी नव्याने वृक्षलागवड करण्याकडे संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे.
...............
नियमांचे पालन करण्याचे आवाहन
वाशिम : कोरोनापासून बचावासाठी शासनाने आखून दिलेल्या उपाययोजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:चे रक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.
...........
रुग्णवाहिकांमुळे रुग्णांची सोय
वाशिम : ग्रामीण भागातील रुग्णांची होणारी गैरसोय टाळता यावी, या उद्देशाने शासनाकडून मिळालेल्या रुग्णवाहिका जिल्हास्तरावरून प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात आल्या. यामुळे रुग्णांची सोय झाली आहे.
....................
बाजारपेठेतील गर्दी नियंत्रणाबाहेर
वाशिम : गेल्या काही दिवसांपासून रात्री आठ वाजेपर्यंत बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू राहत आहेत. पुर्वीच्या तुलनेत ही वेळ चार तासांनी वाढूनही दिवसभर गर्दी नियंत्रणाबाहेर जात असून नागरिक बेफिकीरपणे वागत असल्याचे दिसत आहे.