द वर्ल्ड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:44 IST2021-08-19T04:44:59+5:302021-08-19T04:44:59+5:30

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पंकज बाजड होते. संस्थाध्यक्ष सुनील कदम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी रिता बाजड, स्वाती कदम यांच्यासह ...

Independence Day celebrations at The World School | द वर्ल्ड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

द वर्ल्ड स्कूलमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पंकज बाजड होते. संस्थाध्यक्ष सुनील कदम यांनी ध्वजारोहण केले. यावेळी रिता बाजड, स्वाती कदम यांच्यासह प्राचार्य भावना सुतवणे, उपप्राचार्य मनोज सुतवणे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्य सुतवणे यांच्या हस्ते यावेळी संगणक शिक्षक अमित जैस्वाल यांचा सत्कार करण्यात आला. बुद्धिबळ खेळाचे राज्यस्तरीय पंच म्हणून परीक्षा उत्तीर्ण करून जैस्वाल यांनी द वर्ल्ड स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला, असे मत सुतवणे यांनी व्यक्त केले. संचालन शिक्षिका जसप्रीतकौर सेठी, काजल कोंढाणे यांनी केले. मो. कैफ, आर्यन गोरे, मो. दानिश, मंदार देशमुख, दुर्गेश मलिक, पुष्कर साठे यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोज सुतवणे, अनंत बाजड, नारायण ठेंगडे, ज्ञानेश्वर उखळे, नीलेश विश्वकर्मा, माधुरी गोरे, प्रतिभा मालस, विशाखा चौबे, मीनल सुर्वे, मेघा जाधव, सारिका मगर, भाविका पारवानी, नेहा बोने यांचे सहकार्य लाभले. आभारप्रदर्शन मराठी विभागाच्या शिक्षिका सारिका मगर यांनी केले.

Web Title: Independence Day celebrations at The World School