मतविभाजनामुळे वाढली चुरस

By Admin | Updated: October 6, 2014 00:43 IST2014-10-06T00:43:34+5:302014-10-06T00:43:34+5:30

वाशिम विधानसभा मतदारसंघात उमेदवारांच्या संख्येने वाढली मतदारांची डोकेदुखी.

Increased competition due to divisiveness | मतविभाजनामुळे वाढली चुरस

मतविभाजनामुळे वाढली चुरस

नाना देवळे / मंगरूळपीर
मंगरुळपीर : वाशिम विधानसभा मतदारसंघात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा सेना व काँग्रेस राष्ट्रवादीची युती तुटल्याने मोठया प्रमाणात मतविभाजन झाल्याने चुरस वाढल्याचे संकेत दिसून येत आहे.
गत विधानसभा निवडणुकीमध्ये प्रमुख पक्षाची युती असल्याने मतविभाजनाला फारसा वाव नव्हता त्यामुळे कोण उमेदवार निवडून येईल याचा अंदाज घेणे सहज शक्य हो ते परंतु यावेळी प्रमुख पक्षाची युती तुटल्याने मतविभाजन झाले आहे त्यामुळे प्रमुख पक्षाच्या उमेदवाराला प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्यामध्ये मोठी दमछाक होणार आहे. म तदारसंघात भाजप काँग्रेस, शिवसेना राष्ट्रवादी मनसे या पाचही पक्षाचे उमेदवार उभे असून त्यांचा प्रचार शहरी तथा ग्रामीण भागातील मतदारापर्यंत पोहचणो अत्यंत निकडीचे आहे. कारण यावेळी गठ्ठा मतदान व जातीचे मतदान हे समीकरण कालबाहय ठरत आहे. याशिवाय कॉग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस,सेना ,भाजप,मनसेमध्ये पाडा-पार्डीचे राजकारण आहे. या महत्वपुर्ण बाबी विसरुन चालणार नाही यामध्ये विशेषत: भाजप-शिवसेना व मनसे या पक्षांच्या मतांचे विभाजन होणार आहे.त्या तुलनेत काँग्रेसचे म ताचे विभाजन कमी होईल.मात्र काही प्रमाणात गटबाजी डोकेदुखी ठरु शकते.राष्ट्रवादी पक्षात गेली अनेक वर्षापासून असलेली अंतर्गत गटबाजी मतभेद असल्यामुळे निवडून येण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार आहे. असे असले तरी अखेर ऐनवेळी मतविभाजनाच्या स्थितीमध्ये कोण बाजी मारतो हे येणारा काळच ठरवेल.

Web Title: Increased competition due to divisiveness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.