मतदानाची टक्केवारी वाढवा!
By Admin | Updated: September 29, 2014 02:23 IST2014-09-29T02:23:27+5:302014-09-29T02:23:27+5:30
वाशिम जिल्हा प्रशासनाचे सामाजिक संघटनांना आवाहन

मतदानाची टक्केवारी वाढवा!
वाशिम : आगामी विधानसभा निवडणूकीमध्ये विक्रमी मतदान व्हावे यासाठी समाजातील सर्व घटकांनी प्रयत्न करावेत यासाठी प्रशासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.
मतदान वाढविण्याकरिता बैठकाही घेण्यात येत आहेत. नुकतेच या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये विविध संस्था, संघटनाची बैठक घेवून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी सर्वांनी याकरीता प्रयत्न करण्याचे आवाहन सुध्दा केले आहे.
जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी प्रत्येक संस्था, व्यापारी व व्यावसायीक संघटनांनी सामाजिक बांधिलकी म्हणून मतदार जागृती अभियानात सहभाग नोंदवण्याची गरज आहे. प्रत्येक घटकाने प्रामाणिक प्रयत्न करुन नागरीकांना निर्भयपणे व उत्साहाने मतदान करण्यास प्रोत्साहित केल्यास जिल्ह्यात निश्चितच मतदानात वाढ झाल्याचे दिसून येईल. यावेळी जिल्हाधिका-्यांनी मतदार जागृ तीसाठी कशा पध्दतीने प्रयत्न करता येतील याची माहिती उपस्थित पदाधिकारी व व्यापारी मंडळींना दिली.