सिंचन अनुशेषात वाढ
By Admin | Updated: March 29, 2017 15:40 IST2017-03-29T15:40:29+5:302017-03-29T15:40:29+5:30
तालुक्यात रब्बी हंगामात एकूण पेरणीक्षेत्र ५७ हजार हेक्टर आहे. यापैकी केवळ सात हजार हेक्टरवर सिंचन होते.

सिंचन अनुशेषात वाढ
मंगरूळपीर : एकिकडे सिंचनासाठी भरघोष निधी उपलब्ध करून दिला जात असल्याचे सरकारतर्फे सांगितले जाते तर दुसरीकडे सिंचनाचा अनुशेषही वाढत असल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडत आहेत.
मंगरूळपीर तालुक्यात रब्बी हंगामात एकूण पेरणीक्षेत्र ५७ हजार हेक्टर आहे. यापैकी केवळ सात हजार हेक्टरवर सिंचन होते. ३० हजार हेक्टर सिंचनाची सुविधा उपलब्ध होणे अपेक्षीत आहे. २२ हजार हेक्टर सिंचनाचा अनुशेष आहे. तालुक्यात एकूण १५ सिंचन प्रकल्प आहेत. १५ सिंचन प्रकल्प व विहिरी, बोअरवेल आदींच्या माध्यमातून सात हजार हेक्टरवर सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. १०० हेक्टरपर्यंतचे सिंचन क्षमता असलेले २८ पाझर तलाव व गाव तलाव आहे. मात्र, या तलावांची देखभाल दुरूस्ती नाही. त्यामुळे सदर तलाव नादुरूस्त आहेत. सन २००१ पासून या तलावाची मालकी कुणाकडे यासंदर्भातचा मुद्दा अद्यापही स्पष्ट झालेला नाही. जलसंपदा विभाग व जिल्हा परिषद लुघसिंचन विभाग यांच्यामध्ये हस्तांतरणाचा प्रश्न अनुत्तरीय आहे.