ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:41 IST2021-03-10T04:41:24+5:302021-03-10T04:41:24+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गतची कामे करून घेण्यासाठी गावपातळीवर ...

ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ !
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत मजुरांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. या योजनेंतर्गतची कामे करून घेण्यासाठी गावपातळीवर ग्रामरोजगार सेवकाची निवड केली जाते. मजुरांचे जॉबकॉर्ड भरून घेणे, त्यांच्या नोंदी ठेवणे, जॉबकार्ड देणे तसेच रोजगार हमीच्या कामाांबाबत ग्रामसेवकास सहकार्य करणे या सर्व कामांची जबाबदारी या रोजगार सेवकांवर सोपविण्यात आली. या सेवेच्या मोबदल्यात समाधानकारक मानधन मिळावे, अशी मागणी रोजगार सेवकांमधून पुढे आली होती. याची दखल घेत ग्रामरोजगार सेवकांच्या मानधनात वाढ करण्यात आली आहे. एक हजार मनुष्य दिवसपर्यंत यापूर्वी रोजगार सेवकांना एकूण मजुरी प्रदान खर्चाच्या २.२५ टक्के मानधन मिळत होते. आता सहा टक्क्यानुसार मानधन मिळणार आहे. ७५१ ते १५०० मनुष्य दिवसपर्यंत मासिक दोन हजार रुपये मानधन, १५०१ ते २५०० मनुष्य दिवसपर्यंत मासिक तीेन हजार, २५०१ ते ४००० मनुष्य दिवसपर्यंत मासिक साडेतीन हजार, ४००१ ते ५५०० मनुष्य दिवसपर्यंत मासिक चार हजार असे रोजगारावरील मनुष्य दिवसानुसार मानधन मिळणार आहे.