फलकावर चुकीची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:27 IST2021-02-05T09:27:29+5:302021-02-05T09:27:29+5:30
................ पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास ताेंडगाव : येथे जि. प. ग्रामीण पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. जि. ...

फलकावर चुकीची माहिती
................
पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास
ताेंडगाव : येथे जि. प. ग्रामीण पेयजल योजनेचे काम पूर्णत्वास आले आहे. जि. प. सभापती चक्रधर गोटे यांनी या कामासाठी पुढाकार घेऊन मंत्रालयातून परवानगी मिळविली हाेती.
...............
टरबूज लागवडीत वाढ
धनज : टरबूज, खरबूज फळपिकांच्या लागवडीसाठी पोषक वातावरण असल्याने धनज बु. परिसरात टरबूज लागवडीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. यंदा धनज बु. परिसरात टरबुजाच्या लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे.
.................
ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम अपूर्णच
कारंजा : जानोरी ते शहा फाटा मार्गे पानगव्हाण, उकर्डा, पारवा या रस्त्याचे काम दोन वर्षांपासून अपूर्णच आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतून हे काम करण्यात येत आहे.
..............
दापुरानजीक रस्त्यावर खड्डेच खड्डे
कारंजा : जड वाहनांमुळे दापुरा बसथांब्यानजीक मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे इतर वाहनधारकांना येथून मार्गक्रमण करताना त्रास हाेत आहे.