कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 04:23 PM2020-08-30T16:23:15+5:302020-08-30T16:23:26+5:30

वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे.

Inclusion of Karanja Agricultural Produce Market Committee in e-name | कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश 

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश 

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क 
कारंजा (वाशिम): येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा ई-नाममध्ये समावेश करण्यात आला आहे. या अंतर्गत आॅनलाईन पद्धतीने खरेदी-विक्रीचे व्यवहार होणार आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात बाजार समिती अंतर्गत खरेदीदार (व्यापारी) व अडते यांची नोंदणी करण्यात आली, ही माहिती बाजार समितीचे सचिव निलेश भाकरे यांनी शनिवारी दिली. 
राष्ट्रीय कृषी बाजार अथवा 'राष्ट्रीय कृषी मंडी' तथा ई-नाम, ही भारत सरकारने शेतक?्यांसाठी सुरू केलेली एक योजना आहे.२०१५ -१६च्या अर्थसंकल्पात देशात राष्ट्रीय कृषी बाजार स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली ,केंद्र सरकार ,नीती आयोग आणि राज्याशी सल्लामसलत करून एकीकृत राष्ट्रीय कृषी बाजार स्थापना करेल अशी ती घोषणा होती. वाशिम जिल्ह्यातील पाच बाजार समित्यांचा या योजनेत समावेश झाला असून, आता यात कारंजा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश झाला आहे. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाºया खरेदीदार आणि अडत्यांची त्यात नोंदणी करण्यात आली असून, पुढील कामकाजासाठी शेतकरी बांधवांची नोंदणी होणे आवश्यक आहे. शेतकरी बांधवांची नोंदणी ई-नाम पोर्टलमध्ये करता यावी म्हणून शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी आणताना आधार कार्ड आणि बँक पासबूकची प्रत सोबत आणण्यास कळवावे, असे आवाहन बाजार समितीच्या सचिवांनी केले आहे.

Web Title: Inclusion of Karanja Agricultural Produce Market Committee in e-name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.