वाशिम येथे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पध्रेचे उद्घाटन
By Admin | Updated: October 17, 2014 00:43 IST2014-10-17T00:43:03+5:302014-10-17T00:43:03+5:30
राज्यभरातून १४४ खेळाडूंचा सहभाग, तीन दिवस चालणार स्पर्धा.

वाशिम येथे राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पध्रेचे उद्घाटन
वाशिम : राज्यस्तरीय शालेय धनुर्विद्या स्पर्धेला आज सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास जिल्हा क्रीडा संकुलावर थाटात प्रारंभ झाला. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. राज्याचे क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषदेच्यावतीने गत महिनाभरापासून विविध प्रकारच्या शालेय क्रीडा स्पर्धांंना सुरुवात झाली आहे. १४ वर्षे वयोगटातील (मुले/मुली) राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा घेण्याची जबाबदारी राज्याच्या क्रीडा विभागाने वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयावर सोपविली होती. या स्पर्धेला रीतसर उद्घाटनाने सायंकाळी प्रारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी उद्घाटक होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अमरावती विभागाचे क्रीडा उपसंचालक डॉ. जयप्रकाश दुबळे, जिल्हा कोशागार अधिकारी पी. डी. राठोड, महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेचे अमरावती येथील सचिव प्रमोद चांदुरकर, जिल्हा न्यायधीश चतुर आदींची उपस्थिती होती. राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धा १७ ते १९ ऑक्टोबर दरम्यान १४ वर्षे वयोगटातील (मुले/मुली) स्थानिक जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणावर पार पडणार आहे. या स्पर्धेत विभाग स्तरावर विजयी झालेले प्रत्येक विभागांतील आठ मुले आणि आठ मुली असे एकूण १८ खेळाडू सहभागी होणार आहे. राज्यातील एकूण आठ विभागांतून १४४ खेळाडू या स्पर्धेत आपले भाग्य अजमावणार आहेत. खेळाडूंबरोबरच प्रत्येक विभागातून मुले, मुली या गटातील प्र त्येकी एक संघव्यवस्थापक असे १८ संघव्यवस्थापकही दाखल झाले आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी दिनकर उजळे, क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर, काटोलकर, भारत वैद्य, देविदास धामणकर, कलिम बेग मिर्झा यांच्यासह कर्मचारी व विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी स्पर्धेसाठी परिश्रम घेत आहेत.