पशूवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी वाचनालयाचे उद्घाटन

By Admin | Updated: April 16, 2017 13:37 IST2017-04-16T13:37:45+5:302017-04-16T13:37:45+5:30

पशु वैद्यकीय दवाखाना एकलारा येथे शेतकरी वाचनालय सुरुकरण्यात आले.

Inauguration of Farmer's Library in Veterinary Hospital | पशूवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी वाचनालयाचे उद्घाटन

पशूवैद्यकीय दवाखान्यात शेतकरी वाचनालयाचे उद्घाटन

बुलडाणा : दिवसेंदिवस पशुधनाची होणारी कत्तल यांची कारणे, दुधाळ जनावरे
कशी ओळखावी, जनावरांच्या देशी व विदेशी जाती, दुग्ध व्यवसाय कसा करावा या
बाबींचा विचार करुन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.सुनिल पसरटे व डॉ.संदीप
राठोड. जि.प.बुलडाणा, प.वि.अ.डॉ.दत्तात्रय मोरे व डॉ.पवार यांच्या
मार्गदर्शनाखाली पशुवैद्यकीय दवाखाना एकलारा येथील संस्थाप्रमुख डॉ.किरण
सोनुने यांच्यामार्फत शेतकरी वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवल्या गेली.
याकरिता भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीदिनाचे
औचित्य साधून पशु वैद्यकीय दवाखाना एकलारा येथे शेतकरी वाचनालय सुरु
करण्यात आले. ह्या वाचनालयाचे उद्घाटन पं.स.माजी सभापती तथा विद्यमान
पं.सदस्य मा.लक्ष्मणराव अंभोरे यांचे हस्ते तथा एकलारा ग्रा.पं.चे सरपंच.रेणुकाताई पवार ह्यांचे प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. ह्या प्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १२६ वी जयंती असल्याने एकलारा येथील
प्रतिष्ठित युवा नेते प्रकाश पाटील अंभोरे यांनी १२६ पुस्तकांचा संच भेट
म्हणून दिला. त्याबद्दल त्यांचा पशु वैद्यकीय दवाखान्याचे संस्थाप्रमुख
डॉ.किरण सोनुने ह्यांनी सत्कार केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामसेवक
पी.जी.जाधव ह्यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ.अनिल साळवे ह्यांनी केले.
सदर कार्यक्रमास भरोसा येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचे पशुवैद्यकीय
अधिकारी डॉ.दिनेश पवार, गणेश वायाळ, हरी घेवंदे, ग्रा.पं.सदस्य,
ग्रामसेवा सहकारी संस्थेचे संचालक, प्रतिष्ठित नागरिक, तंटामुक्तीचे
अध्यक्ष भोरसा भोरशी येथील सरपंच, उपसरपंच व सदस्य उपस्थित होते.
(प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of Farmer's Library in Veterinary Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.