मानोऱ्यात भर चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला; एक जागीच ठार, १ जण गंभीर

By नंदकिशोर नारे | Updated: May 26, 2023 15:09 IST2023-05-26T15:09:23+5:302023-05-26T15:09:38+5:30

पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला

In Washim, Fatal attack on two at Bhar Chowk in Manor; One killed on the spot, 1 seriously | मानोऱ्यात भर चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला; एक जागीच ठार, १ जण गंभीर

मानोऱ्यात भर चौकात दोघांवर जीवघेणा हल्ला; एक जागीच ठार, १ जण गंभीर

वाशिम -  मानाेरा येथील छ.शिवाजी महाराज चौकात  २६ मे रोजी सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान दोन युवकावर धारदार चाकूने जीवघेणा हल्ला करण्यात आला. यात  एक जण जागीच ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

शिवाजी महाराज चौक मानाेरा येथे  शिवा विलास उघडे (वय २०)  रा. बेलोरा ( विठोली) आणी त्याचा मित्र राहुल मनोहर चव्हाण (वय २५) रा. भुली हे उभे असताना अज्ञात मारेकरी मोटार सायकलवरून आले आणि त्यांचेवर धारदार चाकूने वार करून निघून गेले. या हल्यात शिवा याचा मृत्यू झाला असून राहुल हा गंभीर जखमी झाला. त्यास पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. आरोपी हे मागंकिन्ही तालुका दारव्हा येथील असल्याची घटनास्थळी चर्चा हाेती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून गुन्हा दाखल केला

Web Title: In Washim, Fatal attack on two at Bhar Chowk in Manor; One killed on the spot, 1 seriously