शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ई-केवायसीत राज्यात वाशिम जिल्हा अव्वल तर भंडारा दुसऱ्या क्रमांकावर 

By संतोष वानखडे | Updated: September 8, 2022 18:08 IST

ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

वाशिम: प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर असून, दुसऱ्या क्रमांकावर भंडारा व तिसऱ्या क्रमांकावर नाशिक जिल्हा आहे. देशातील शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत करण्याचा निर्णय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून घेतला. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना संपूर्ण देशभर लागू केली आहे. दर चार महिन्यांनी या योजनेचा २ हजार रुपयांचा हप्ता योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येतो. 

मात्र केंद्र शासनाने या योजनेबाबत निर्णय घेऊन यापुढील हप्त्यांच्या संबंधित शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक केले आहे. पुढील हप्त्यांच्या लाभापासून जिल्ह्यातील पात्र शेतकरी वंचित राहू नये, यासाठी ई-केवायसी करण्याच्या जिल्हाधिकारी शण्मुगराजन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया ८ सप्टेंबरपर्यंत पूर्ण केली आहे. आता केवळ २५ हजार २४ शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे बाकी आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेत ई-केवायसी करण्याच्या प्रक्रियेत वाशिम जिल्हा राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे.

व्यापक प्रमाणात जनजागृतीवाशिम जिल्ह्यात या योजनेसाठी पात्र असलेल्या १ लाख ८९ हजार ३७५ लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले आहे. त्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवर ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे. १८ ऑगस्टपर्यंत ७० हजार ८६७ शेतकरी ई-केवायसी करण्यापासून दूर होते. त्यानंतर जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस यांनी पुढाकार घेत ई-केवायसीबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. त्यानुसार जनजागृती झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ६४ हजार ३५१ शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. 

टॅग्स :PM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाwashimवाशिमbhandara-acभंडाराNashikनाशिक