नादुरूस्त रोहित्र दिले जातेय तत्काळ बदलून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2017 13:42 IST2017-10-16T13:42:08+5:302017-10-16T13:42:52+5:30

Improved transfer is being changed immediately! | नादुरूस्त रोहित्र दिले जातेय तत्काळ बदलून!

नादुरूस्त रोहित्र दिले जातेय तत्काळ बदलून!

ठळक मुद्देग्रामस्थांची सोय रब्बी हंगामाचीही महावितरणकडून चोख तयारी

वाशिम: वाशिमच्या महावितरणने कामकाजात सद्या चांगलीच कात टाकली असून जिल्हाभरात कुठेही आणि कुठल्याही कारणाने विद्यूत रोहित्र नादुरूस्त झाल्याची तक्रार प्राप्त होताच विनाविलंब ते बदलून देण्याची कार्यवाही केली जात आहे. यामुळे ग्रामीण भागातील नागरिक तथा शेतकºयांची सोय होत असून महावितरणच्या कार्यप्रणालीबाबत समाधान व्यक्त होत आहे. 

महावितरणने गेल्या काही दिवसांपासून विजचोरांवर धडक कारवाईची मोहिम हाती घेतली असून यामाध्यमातून सुमारे ३५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. याशिवाय वीज गळतीचेही प्रमाण कमी झाले आहे. विद्यमान अधीक्षक अभियंता व्ही.बी.बेथारिया, कार्यकारी अभियंता तायडे, पी.के.चव्हाण आदिंनी नादुरूस्त रोहित्रांकडेही विशेष लक्ष पुरविले असून असे रोहित्र विनाविलंब बदलून देण्याची कार्यवाही केली जात आहे. 

Web Title: Improved transfer is being changed immediately!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.