जुगार अड्डय़ांवर छापे
By Admin | Updated: May 7, 2015 01:03 IST2015-05-07T01:03:38+5:302015-05-07T01:03:38+5:30
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई.

जुगार अड्डय़ांवर छापे
वाशिम : रिसोड व मालेगाव तालुक्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्डय़ांवर छापे टाकून तीन आरोपींविरुद्ध कारवाई केली. आरोपींकडून सहा हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यांना अटक करण्यात आली. ही घटना ४ व ५ मे रोजी घडली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक आर.पी. पाटील यांच्या मार्गदर्शनात साहाय्यक निरीक्षक आर. जी. शेख, हवालदार लक्ष्मण कोल्हे, बुद्धू रेघीवाले, प्रदीप चव्हाण, आत्माराम राठोड, नागोराव खंडके, विनोद अवगळे, संदीप इढोळे, प्रदीप डाखोरे, उमेश कांबळे यांचा समावेश असलेल्या पथकाने ४ मे रोजी मालेगाव तालु क्यातील मेडशी येथे जुगार अ.ड्डय़ावर छापा टाकला. या छाप्यामध्ये कैलास प्रल्हाद तायडे (रा. मेडशी) व सूर्यभान संपत गिर्हे (रा. पातूर) या दोघांना वरली-मट क्याच्या साहित्यासह अटक केली. त्यांच्याजवळून रोख २३७0 रुपये जप्त करून मालेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रिसोड येथील खरेदी-विक्री कार्यालयासमोर असलेल्या वरली मटका जुगार अड्डय़ावरही या पथकाने छापा टाकला. या छाप्यामध्ये राजू वामन पंडित याला वरली-मटक्याच्या साहित्यासह रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून रोख ३१८0 रुपये ज प्त करण्यात आले. पंडीत याच्याविरुद्ध रिसोड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्यां तर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. रिसोड तालुक्यातील हराळ येथे एका महिलेच्या घरा तून देशी दारूचे ३0 नग पकडण्यात आले. सदर कारवाई पोलीस उपनिरीक्षक ईश्वर चव्हाण यांच्या पथकाने ६ मे रोजी दुपारच्या सुमारास केली.