महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  - जिल्हाधिकारी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 04:44 PM2019-05-17T16:44:37+5:302019-05-17T16:45:02+5:30

वाशिम : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या सभेत दिल्या.

Implement effective Maharashtra Animal Protection Act - Collector | महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  - जिल्हाधिकारी  

महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करा  - जिल्हाधिकारी  

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्याची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी तसेच गोवंश हत्या व जनावरांच्या अवैध वाहतुकीवर आळा घालण्यासाठी त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी १७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या जिल्हास्तरीय प्राणी क्लेश प्रतिबंध समितीच्या सभेत दिल्या.
यावेळी जिल्हा पशुसंवर्ध उपायुक्त डॉ. बी. एस. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. इर्शाद खान, सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त डॉ. एन. डी. खाजोने, प्रभारी सहाय्यक वन संरक्षक एस. आर. नांदुरकर, पोलीस निरीक्षक बी. जी. कºहाळे यांच्यासह समितीचे शासकीय व अशासकीय सदस्य उपस्थित होते. जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार राज्यात गोवंशीय प्राण्यांची कत्तल करणे तसेच कत्तलीकरिता वाहतूक करण्यास मनाई आहे. गोवंशीय प्राण्यांची कत्तलीकरिता खरेदी विक्री अथवा वाहतूक होत असल्यास त्यावर परिवहन विभाग व पोलीस विभागाने कारवाई करावी तसेच गोवंशीय प्राण्यांची कत्तल होणार नाही, यासाठी सुद्धा आवश्यक कार्यवाही करावी. प्राण्यांची वाहतूक करतांना त्यांना ईजा होणार नाही, तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्राण्यांची वाहनांमधून वाहतूक होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्राण्यांची वाहतूक करणाºया वाहनधारकाकडे सहाय्यक पशुसंवर्धन आयुक्त यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक असून, असे प्रमाणपत्र नसल्यास त्या वाहनावर कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी यावेळी दिल्या. तसेच यापुढे होणाºया सभेमध्ये या अनुषंगाने जिल्ह्यात किती वाहनांवर कारवाई करण्यात आली, याचा आढावा घेतला जाईल, असे सांगितले. या बैठकीत उपस्थित शासकीय व अशासकीय सदस्यांना केंद्राचा प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० तसेच महाराष्ट्र शासनाचा प्राणी संरक्षण कायदा १९७६ व महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियममधील नियम व अटींचे सविस्तर माहिती देण्यात आली.

Web Title: Implement effective Maharashtra Animal Protection Act - Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.