कनिष्ठ अभियंताची त्वरीत नियुक्ती करावी
By Admin | Updated: July 30, 2014 00:38 IST2014-07-30T00:38:52+5:302014-07-30T00:38:52+5:30
कनिष्ठ अभियंताचा कारभार प्रभारी असल्याने विज ग्राहकाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे.

कनिष्ठ अभियंताची त्वरीत नियुक्ती करावी
मंगरुळपीर :तालुक्यातील सर्वात मोठय़ा शेलूबाजार बाजारपेठ सह परिसरातील जवळपास २५ गावाना येथील सब स्टेशन करून विज पुरवठा केल्या जातो.त्या ठिकाणच्या महावितरण कार्यालयात मागील महिनाभरा पासुन कनिष्ठ अभियंताचा कारभार प्रभारी असल्याने विज ग्राहकाना अनेक अडचणीचा सामना करावा लागत आहे. वरिष्ठांनी ग्राहकाच्या समस्या लक्षात घेवुन कायमस्वरूपी व मुख्यालयी राहणारा कनिष्ठ अभियंता देण्यात यावे अशी मागणी होत आहे शेलूबाजार येथील वादग्रस्त कनिष्ठ अभियंत्याची मागील महिण्यात जिल्हा बदली झाली तेव्हा पासुन येथील महावितरण कार्यालयाचा कारभार मंगरूळपीर येथील एका अभियंताकडे देण्यात आला परंतु सदर अभियंता येथे येवुन कारभार पाहत नसल्याने विज ग्राहकाच्या समस्या अधिकच वाढल्या आहेत वारंवार खंडीत होणार्या विज पुरवठय़ामुळे ग्राहक प्रचंड वैतागले आहे. विज प्रवाहाच्या वाहीनीला अडथळा ठरणारी झाडांची कटाई झाली नसल्याने वारंवार विज पुरवठा बंद पडत आहे. त्याच बरोबर शेलूबाजार येथील बाजार समिती नजीकच्या रोहित्राला दि २९ च्या दुपारी आग लागल्याने त्या भागातील विज पुरवठा खंडीत झाला होता. असा प्रकार वारंवार घडत असल्याने संबधितांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसून येते. वरिष्ठांनी याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.