उमरवाडी पाझर तलावातून पाण्याचा अवैध उपसा
By Admin | Updated: April 14, 2016 01:40 IST2016-04-14T01:40:55+5:302016-04-14T01:40:55+5:30
वाशिम जिल्ह्यातील मेडशी येथील प्रकार.

उमरवाडी पाझर तलावातून पाण्याचा अवैध उपसा
मेडशी (जि. वाशिम): मालेगाव तालुक्यातील उमरवाडी पाझर तलावावरून अवैधरीत्या पाणी घेणार्यांविरुद्ध उमरवाडी ग्रामस्थांनी १३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता दरम्यान पोलीस चौकी मेडशी येथे ठिय्या आंदोलन केले. याची दखल घेत लघू सिंचन विभागाने या तलावातून पाणी उपसा करणार्यांचे पीव्हीसी पाइप जप्त करण्यात आले.
शंभर टक्के आदिवासीबहुल असलेल्या उमरवाडी येथील ग्रामस्थांनी याबाबत पोलीस चौकीत फिर्याद दिली. उमरवाडी ग्रामस्थांनी ८ मार्च २0१६ रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मालेगाव तहसीलदार, गटविकास अधिकारी, लघू सिंचन विभाग यांना निवेदन देऊन उमरवाडी तलावातून अवैध पाणीउपसा बंद करण्याची मागणी केली होती. मेडशी शिवारात उमरवाडी गावासाठी पाणीपुरवठा करण्याकरिता तलावाच्या खालच्या बाजूला विहीर घेतली असून, त्या विहिरीतून गावाला पाणी पुरवठा करण्यात येतो. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे तलावात पाण्याचा साठा अत्यंत कमी प्रमाणात आहे.