ई-क्लास जागेवरील झाडांची अवैध कत्तल
By Admin | Updated: November 21, 2014 01:11 IST2014-11-21T01:11:18+5:302014-11-21T01:11:18+5:30
बाभळीची झाडे अवैधरित्या तोडण्यात येत असतानो प्रशासनाचे दुर्लक्ष

ई-क्लास जागेवरील झाडांची अवैध कत्तल
धनज बु. : येथून जवळच असलेल्या अंबोडा येथील ई-क्लास जमिनीवर मोठय़ा प्रमाणात मोठमोठी झाडे आहेत. यातील बाभळीचे एक मोठे झाड कुठलीही परवानगी न घेता अवैधरित्या तोडण्यात आले आहे. प्रत्यक्षात बाभळीची झाडे अवैधरित्या तोडण्यात येत असताना या प्रकाराकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसत आहे. शासन वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करीत असताना महसूल विभागाचे कर्मचारी डोळेझाक करीत असल्यामुळे २0 वर्षांपूर्वीचे बाभळीचे झाड क्षणातच जमीनदोस्त करण्यात आल्याचा प्रकार या ठिकाणी घडत आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यात वृक्षांची भूमिका महत्त्वाची आहे.
ही बाब लक्षात घेऊन भविष्यात असा प्रकार घडू नये यासाठी संबंधित अधिकारी, कर्मचार्यानी या प्रकरणी चौकशी करून दोषीवर कारवाई करावी, अशी मागणी येथील वृक्षप्रेमींनी केली आहे.