कंपनीच्या टँकरद्वारे डिझेल, पेट्रोलची अवैध विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:43 IST2021-05-18T04:43:20+5:302021-05-18T04:43:20+5:30
रिसोड तालुक्यात इतर जिल्ह्यांतील पेट्रोलपंप चालक हा ग्रामीण भागात टँकर आणून पेट्रोल व डिझेलची अवैध विक्री करीत आहे. याबाबतचा ...

कंपनीच्या टँकरद्वारे डिझेल, पेट्रोलची अवैध विक्री
रिसोड तालुक्यात इतर जिल्ह्यांतील पेट्रोलपंप चालक हा ग्रामीण भागात टँकर आणून पेट्रोल व डिझेलची अवैध विक्री करीत आहे. याबाबतचा कुठलाही परवाना त्याच्याकडे नसल्याची माहिती आहे. दरम्यान, हा पेट्रोलपंप चालक हा १६ मे रोजी रिसोड तालुक्यातील धोडप येथे डिझेल व पेट्रोलची अवैध विक्री करीत असल्याची माहिती एका व्यक्तीकडून रिसोड पोलिसांना प्राप्त झाली. त्याची शहानिशा करण्यासाठी रिसोड पोलिसांनी टँकर चालकाला पकडण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यात यश मिळाले नाही. पेट्रोल, डिझेल विक्री करणाऱ्या संबंधित पेट्रोलपंप चालकास रिसोड पोलिसांनी कागदपत्रांची मागणी केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. हे प्रकरण पुरवठा विभागाच्या अखत्यारित येत असल्याने पोलीस प्रशासनाला कुठलीच ठोस कारवाई करता आली नाही.
......................
रिसोड तालुक्यातील गावांमध्ये पेट्रोल व डिझेलची अवैध विक्री करणाऱ्या टँकरला परवानगी दिलेली नाही. असा प्रकार पुन्हा कुठेही आढळून आल्यास हा टँकर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येईल व संबंधित मालकावर कारवाई करण्यात येईल.
गणेश राठोड
निरीक्षण अधिकारी, पुरवठा विभाग, रिसोड.