चार लाख रुपये किमतीच्या सागवानाची अवैध कटाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2016 00:10 IST2016-08-29T00:10:40+5:302016-08-29T00:10:40+5:30
गोस्ता गावातील प्रकार : ‘ई-क्लास’ जमिनीवरून तोडली झाडे.

चार लाख रुपये किमतीच्या सागवानाची अवैध कटाई!
वाशिम, दि. २८: जिल्हय़ातील गोस्ता (ता. मानोरा) येथील गट क्रमांक २६३/३ मधील शेतातून सागवान झाडे तोडण्याची परवानगी मागून दुसर्याच जमिनीवरून १३ घनमीटर (किंमत ३ लाख ९0 हजार रुपये) झाडे तोडल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी ह्यडीएफओह्ण स्तरावर चौकशी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विजय सवाईराम राठोड (रा. गोस्ता) या कास्तकाराच्या नावे प्रकरण दाखवून त्यांच्या २६३/३ या गट क्रमांकातील शेतातून सागवानाची ४६ झाडे तोडण्याची परवानगी मानोरा रेंजरकडून घेण्यात आली. त्यानुसार, १२.९९५ घनमीटर माल तयार करून हे प्रकरण ह्यडीएफओह्ण यांच्याकडे पाठविण्यात आले. प्रत्यक्षात मात्र विजय सवाईराम राठोड यांच्या शेतामधील सागवानाचे एकही झाड न तोडता दुसर्याच एका आदिवासी शेतकर्याच्या आणि काही सागवानाची झाडे सरकारी ह्यई-क्लासह्ण जमिनीवरून तोडण्यात आल्याची खळबळजनक माहिती सूत्रांनी दिली. तथापि, हे प्रकरण उजेडात आल्यानंतर सदर सागवानाच्या झाडांपासून तयार झालेला १२.९९५ घनमीटर माल ह्यडीएफओह्ण यांनी जप्त केला असून याप्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहितीदेखील सूत्रांनी दिली.