रिसोड येथे अवैध दारू विक्रेत्यास अटक
By Admin | Updated: February 4, 2015 01:13 IST2015-02-04T01:13:53+5:302015-02-04T01:13:53+5:30
९ हजार ६00 रूपयांचा माल जप्त.

रिसोड येथे अवैध दारू विक्रेत्यास अटक
रिसोड (वाशिम): शहरालगत असलेल्या एका मळय़ामध्ये अवैधरीत्या देशी दारू विक्रेत्यास पकडून त्याच्याकडील ५ पेटी दारू किंमत ९ हजार ६00 रुपयांचा माल जप्त केल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली.
याबाबत पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, डी.बी. पथकास शहरानजिक एका शेतामध्ये अवैघ देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. या माहि तीवरून पोलीस घटनास्थळी पोहोचले असता गजानन भोपाळे याच्याजवळ अवैध देशी दारूसाठा आढळून आला. या इसमाची चौकशी व तपासणी केली असता इसमाकडून ९ हजार ६00 रुपये किंमत असलेली ५ पेट्या देशी दारू जप्त केली. आरोपी गजानन भोपाळे याच्या विरूद्ध अवैध दारू विक्री अँक्टनुसार पोलिसांनी कारवाई केली. कारवाई ठाणेदार सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे पोलीस उपनिरिक्षक हुंडेकर, संदीप बावस्कर, गुणवंत गायकवाड यांच्यासह पथकाने केली आहे.