वाशिम-शेलूबाजार रस्त्यावर अवैध उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:40 IST2021-04-06T04:40:15+5:302021-04-06T04:40:15+5:30
0000000000 अवैध प्रवासी वाहतूक नियंत्रणाबाहेर जऊळका रेल्वे : परिसरातील अनेक गावांमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी ...

वाशिम-शेलूबाजार रस्त्यावर अवैध उत्खनन
0000000000
अवैध प्रवासी वाहतूक नियंत्रणाबाहेर
जऊळका रेल्वे : परिसरातील अनेक गावांमधून अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबून हा प्रकार राजरोस सुरू असताना पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. कारवाई करण्याबाबत महेश बरगट यांनी सोमवारी ठाणेदारांना निवेदन दिले.
00000000000
इंझोरीत कोरोना चाचणी
इंझोरी: गेल्या ९ दिवसांपूर्वी इंझोरी येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला होता. जवळपास दोन महिन्यांनी येथे कोरोना रुग्ण आढळून आल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कुपटा आरोग्य वर्धिनी केंद्रांतर्गत इंझोरी उपकेंद्राकडून गावात कोरोना चाचणीला सुरुवात करण्यात आली आहे.
0000000000
वनदेवीनगरात आणखी एक बाधित
कारंजा : शहरात दिवसेंदिवस कोरोना संसर्गाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यात वनदेवीनगरात तीन दिवसांपूर्वी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्यानंतर सोमवारी पुन्हा येथील एक व्यक्ती बाधित असल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले.
0000000000
महामार्गालगत नालीचे काम
वाशिम : वाशिम-कारंजादरम्यान १६१- ए या राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगात करण्यात येत आहे. आता शहरांतील महामार्गाचे काम पूर्णत्वास येत असल्याने या मार्गालगत नाल्यांचे काम करण्यात येत आहे. मंगरुळपीर आणि कारंजा शहरात या कामाला वेग आला आहे.
000000000000
समृद्ध गाव अंतर्गत सेंद्रिय खत निर्मिती
वाशिम : जिल्ह्यातील ४३ गावांत समृद्ध गाव स्पर्धा राबविली जात आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने गावाचा सर्वांगीण विकास करण्यासह पर्यावरण वृद्धी करण्यावरही भरही दिला जात आहे. त्यासाठी सेंद्रिय शेतीवर भर देण्याबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
00000000000