शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कामरगाव परिसरात अवैध वीटभट्टय़ा

By admin | Updated: November 9, 2014 01:07 IST

नियमाची पायमल्ली : महसूल विभागाने लक्ष देण्याची गरज.

कामरगाव (वाशिम): कारंजा तालुक्यातील कामगरगाव परिसरात अनेक वीटभट्टय़ा विनापरवाना सुरू असून, शासनाचे नियम झुगारून चालविण्यात येत असलेल्या या वीटभट्टय़ांमुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. त्याशिवाय शासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे. ेमहसूल विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. वीटभट्टय़ा लावणार्‍यांना दरवर्षी संबंधित ग्रामपंचायतीसोबतच वनविभागाचे नाहरकत प्रमाणपत्र घ्यावे लागते. यासाठी शासकीय अनुज्ञप्ती शुल्क भरून उपविभागीय कार्यालयाकडून परवानगी दिली जाते; मात्र परिसरात काही वीटभट्टय़ा विनापरवाना सुरळीत सुरू आहेत. वीटभट्टीसाठी तीन आणि पाच लाख वीटनिर्मिती क्षमतेचे परवाने दिले जातात. प्रती एक लाख विटांमागे आठ हजार रुपये याप्रमाणे शासकीय दप्तरी रॉयल्टीचा भरणा तसेच कृषक जागेवर लावण्यात येणार्‍या वीटभट्टीकडून भाडेसुद्धा आकारले जाते. विटासाठी लागणारी माती आणि पाणी वापरण्याचेही नियम आहेत. हे नियम लक्षात घेऊन उत्खननापासून माती काढावी लागते. महसूल विभागाने भरून घेतलेल्या रॉयल्टीनुसारच उत्पादन काढणे आवश्यक असते; परंतु विटाचे वाढीव उत्पादन करून शासनाचा महसूल बुडविण्याचे कामसुद्धा वीट उत्पादकांकडून सुरू आहे. वीटभट्टीचा मालक या सर्व नियमाचे पालन करतो की नाही, याबाबत तपासणी करण्याची जबाबदारी महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांची असते; मात्र तसे होत नाही. परिसरातील वीटभट्टय़ातून लाखो विटांचे विनापरवाना उत्पादन सुरू असताना केवळ हितसंबंधापोटी सर्व आलबेल असल्याचे दिसून येते. तलाठी, ग्रामसेवक, महसूल अधिकारी यांना माहिती असतानासुद्धा सर्रास विनापरवाना वीटभट्टय़ा सुरू असताना अभय कुणाचे, हा प्रश्न निर्माण झाला आहे.