अवैधरित्या गुटखा वाहतूक करणा-यास अटक
By Admin | Updated: July 31, 2015 23:56 IST2015-07-31T23:56:05+5:302015-07-31T23:56:05+5:30
६0 हजाराचा माल जप्त; अनसिंग पोलिसांची कारवाई.

अवैधरित्या गुटखा वाहतूक करणा-यास अटक
अनसिंग( जि. वाशिम): : अवैधरित्या गुटखाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच अनसिंगचे ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांच्यासह कर्मचार्यांनी सापळा रचून १५ हजाराचा गुटख्याची वाहतूक करताना दुचाकीसह आरोपीला अटक करण्याची घटना ३१ जुलैला घडली. दुचाकीसह ६0 हजार रुपयाचा माल जप्त करण्यात आला. अनसिंग परिसरात अवैधरित्या सुरु असणारे व्यवसायावर धाड टाकण्याची मोहीम पोलीस अधिक्षक विनिता साहू यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. अवैधरित्या गुटखा पुडी वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार डि.एम.घुगे यांना मिळताच त्याचे पोलीस शिपाई योगेश इंगळे इतर कर्मचारी यांनी सापळा रचून गुरुवारी ३0 जुलैला अनसिंग धुमकाकडे एम.एच. ३७ फ ९४३३ क्रमांकाच्या हिरो कंपनीच्या दुचाकीने १५ हजार रुपये किमतीचा विमल व इतर गुटखा पुड्या वाहतूक करुन नेत असताना आरोपी संदीप रोहीदास राठोड रा. धुमका यांना पोलिसांनी रंगेहाथ पकडले. अवैधरित्या गुटखा पुडी वाहतूक करणार्याला अनसिंग पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणले. या घटनेची माहिती ठाणेदार ज्ञानेश्वर घुगे यांनी अन्न व भेसळ विभागाचे अधिकारी प्रशांत अजेंडेकर यांनी दिली. अन्न व भेसळ विभागाच्यावतीने प्रशांत अजेंठेकर, अकोला यांनी अनसिंग पोलीस स्टेशनला येवून पंचनामा केला व तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरुन ठाणेदार घुगे यांनी आरोपी संदिप राठोड यांच्यावर कलम २७३, १८८ आयपीसी ५९ (३) अन्न सुरक्षा व मानके कायदा २00६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे व त्यांच्याकडून १५ हजाराचा गुटखा पुड्यासह ४५ हजाराची दुचाकी असा ६0 हजाराचा माल जप्त केला आहे. अनसिंग पोलिसांनी गेल्याच पाच वर्षात पहिल्यांदाच अवैधरित्या गुटखाबाबत कारवाई केल्याची ही घटना आहे.