लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेने न्याय मागावा तरी कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:28 IST2021-02-05T09:28:05+5:302021-02-05T09:28:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम : जिल्ह्यात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्ह्याचा विकास ...

लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेने न्याय मागावा तरी कुणाला?
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्ह्याचा विकास करण्याऐवजी लाेकप्रतिनिधीच आपसात भांडत बसणार तर सर्वसामान्य जनतेने न्याय तरी कुणाला मागावा, असा प्रश्न नागरिकांतून केला जात आहे.
प्रजासत्ताकदिनी खा. भावना गवळी व आ. राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन् क्षणातच शहर बंद हाेण्यास सुरुवात झाली. भाजपाच्या वतीने पाटणी चाैकामध्ये आंदाेलनही केले. यामुळे शहरातील दुकानदारांनीसुध्दा घाबरून आपली प्रतिष्ठाने बंद केली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागाेजागाी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला.
संपूर्ण दिवसभर जिलह्यात या घटनेची चर्चा सर्वांच्या होती. जिल्हावासियांच्या समस्यांसह जिल्ह्याच्या विकासाबाबतचे मुद्दे बाजूला हाेऊन या वादामुळे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. दाेन्ही लाेकप्रतिनिधींनी एकमेकांविरुध्द वाशिम पाेलिसांत तक्रार दाखल केली. या वादाबाबत शहरात विविध विषय चर्चिल्या जात आहे. परंतु, दाेघांनीही दिलेल्या तक्रारीवरून वेगळीच बाब स्पष्ट हाेताना दिसून येत आहे. नेत्यांनी भांडणापेक्षा जिल्हा विकासाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर सर्वसामान्य जनतेने न्याय तरी कुणाला मागावा, असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे. दाेन्ही नेत्यांनी पाेलिसांत तक्रार दिली असली तरी नेमका वाद कशावरून झाला, याबाबत २६ जानेवारी राेजी दाेघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.
............
अनेक दिवसांपासूनचे मतभेद आले पुढे
खा. भावना गवळी व आ. राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद हाेते. परंतु, त्यावर दाेन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवत हाेते. परंतु, या मतभेदाचा बांध प्रजासत्ताकदिनी फुटल्याची आता नागरिकांत चर्चा हाेत आहे.