लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 14:31 IST2021-01-27T14:26:11+5:302021-01-27T14:31:38+5:30
Politics News: लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला?

लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर जनतेनी न्याय मागावा तरी कुणाला?
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्हयात इन मिन तीन आमदार व एक खासदार आहे. विकासासाठी एकत्रितपणे झटून जिल्हयाचा विकास करण्याऐवजी लाेकप्रतिनिधीच आपसात भांडत बसणार तर सर्व सामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न नागरिकांतून केल्या जात आहे.
प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी राेजी खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये वाद झाला अन क्षणातच शहर बंद हाेण्यास सुरुवात झाली. भाजपाच्यावतिने पाटणी चाैकामध्ये आंदाेलनही केले. यामुळे शहरातील दुकानदारांनी सुध्दा घाबरून आपली प्रतिष्ठाने बंद केली. यामध्ये या व्यापाऱ्यांचे नुकसान झाले. वातावरण चिघळू नये याकरिता जागाेगाी पाेलीस बंदाेबस्त लावण्यात आला.
संपूर्ण दिवसभर जिल्हयात या घटनेची चर्चा सर्वांच्या ताेंडी ऐकावयास मिळाली. जिल्हावासियांच्या समस्या सह जिल्हयाच्या विकासाबाबतचे मुद्दे बाजूला हाेऊन या वादामुळे जिल्हयातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले. दाेन्ही लाेकप्रतिनिधींनी एकमेकांविरुध्द वाशिम पाेलीसांत तक्रार दाखल केली. या वादाबाबत शहरात विविध विषय चर्चिल्या जात आहे. परंतु दाेघांनीही दिलेल्या तक्रारीवरुन वेगळीच बाब स्पष्ट हाेताना दिसून येत आहे. नेत्यांनी भांडणापेक्षा जिल्हा विकासाकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
लाेकप्रतिनिधीच भांडत बसणार तर सर्वसामान्य जनतेनी न्याय तरी कुणाला मागावा असा प्रश्न यानिमित्ताने चर्चिल्या जात आहे. दाेन्ही नेत्यांनी पाेलीसात तक्रार दिली असली तरी नेमका वाद कशावरुन याबाबत २६ जानेवारी राेजी दाेघांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद देण्यात आला नाही.
अनेक दिवसांपासूनचे मतभेद आले पुढे
खासदार भावना गवळी व आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामध्ये अनेक दिवसांपासून मतभेद हाेते, परंतु त्यावर दाेन्ही नेते दुर्लक्ष करीत आपआपला कारभार चालवत हाेते. परंतु या मतभेदाचा बांध प्रजासत्ताक दिनी फुटल्याची आता नागरिकांत चर्चा हाेत आहे.