शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय कामासाठी पैशांची मागणी झाल्यास करा सीईओंच्या मोबाईलवर तक्रार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2021 17:36 IST

Washim ZP News थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या (सीईओ) व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे.

ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ८६९१०२१११८ या व्हॉटस् अप क्रमांकावर संदेश करावा.शहानिशा केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाºयाविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाणार आहे.

वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित कोणत्याही शासकीय कामासाठी कुणी पैशाची मागणी करीत असेल तर आता थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या (सीईओ) व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर तक्रार नोंदविता येणार आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कक्षासमोर ठळक अक्षरात सूचनाफलकही लावला आहे.ग्रामीण भागाचे मिनी मंत्रालय म्हणून जिल्हा परिषदेकडे पाहिले जाते. जिल्हा परिषद, पंचायत समितीशी संबंधित एखादे काम करून देण्याच्या नावाखाली एखाद्या अधिकारी किंवा कर्मचाºयांकडून संबंधितांकडे पैशाची मागणी होऊ शकते. पैशाची मागणी पूर्ण न झाल्यास नियमात बसणारे शासकीय काम करण्यास टाळाटाळ होते. हा प्रकार टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी आपल्या कक्षासमोर एक सूचनाफलक लावला आहे. जिल्हा परिषद वाशिम अंतर्गत शासकीय कामाकरीता जिल्हा परिषदेचे अधिकारी अथवा कर्मचारी स्वत: किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने पैशाची मागणी करीत असल्यास मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या ८६९१०२१११८ या व्हॉटस् अप क्रमांकावर संदेश करावा, असा या सूचना फलकावरील आशय आहे. वाशिम जिल्हा परिषदेची स्थापना झाल्यापासून आतापर्यंत एकाही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी कक्षासमोर असा फलक लावला नाही, हे विशेष. शासकीय कामाकरीता कुणी अधिकारी, कर्मचारी पैशाची मागणी करीत असेल तर मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या व्हॉटस् अप क्रमांकावर पुराव्यानिशी तक्रार नोंदविता येणार आहे.

नियमात बसणारे कोणतेही शासकीय काम हे विनाविलंब, पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक आहे. कोणत्याही शासकीय कामाकरीता कोणत्याही अधिकारी, कर्मचाºयांना पैसे देऊ नये. पैशाची मागणी कुणी करीत असेल तर थेट व्हॉटस्अप क्रमांकावर मेसेज करावा. या मेसेजची शहानिशा केल्यानंतर संबंधित अधिकारी, कर्मचाºयाविरूद्ध निश्चितच कारवाई केली जाणार आहे.- मंगेश मोहिते, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वाशिम

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद