वाडीचा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास ८१० हेक्टर जमीन येईल सिंचनाखाली

By Admin | Updated: August 30, 2016 15:33 IST2016-08-30T15:33:08+5:302016-08-30T15:33:08+5:30

तालुक्यातील वाडी रायताळ या सिंचन प्रकल्पाचे कामही रखडले असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ८१० हेक्टर जमिनीवर सिंचन होऊ शकते

If the irrigation project is completed, 810 hectares of land will be irrigated under irrigation | वाडीचा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास ८१० हेक्टर जमीन येईल सिंचनाखाली

वाडीचा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास ८१० हेक्टर जमीन येईल सिंचनाखाली

>- ऑनलाइन लोकमत
रिसोड (वाशिम), दि. 30 - तालुक्यातील वाडी रायताळ या सिंचन प्रकल्पाचे कामही रखडले असून हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यास ८१० हेक्टर जमिनीवर सिंचन होऊ शकते. या प्रकल्पाकरिता शेतक-यांची भुसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून प्रवेशव्दार बंद करणे बाकी आहे. वाकद सिंचन प्रकल्पाचे काम सन २०१० पासून सुरु आहे. या सिंचन प्रकल्पाअंतर्गत शेलुखडसे, पिंपरखेड, वाकद, एकलासपूर, ही गावे बुडीत क्षेत्रात मोडत असून हा प्रकल्प लवकर सुरु व्हावा , अशी शेतक-यांची मागणी आहे. 
 
या सिंचन प्रकल्पामुळे जवळपास ९०० हेक्टर सिंचन स्त्रोत निर्माण होणार आहे. तालुक्यातील बोरखेडी सिंचन प्रकल्प पुर्णत्वास गेला असून या प्रकल्पाअंतर्गत ६८७ हेक्टर जमिनीवर सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. मात्र, या प्रकल्पाच्या कालव्यांचे काम अद्याप बाकी आहे.

Web Title: If the irrigation project is completed, 810 hectares of land will be irrigated under irrigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.