महिलांसाठी स्वच्छता संबंधित स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:33 AM2021-01-14T04:33:17+5:302021-01-14T04:33:17+5:30

शहरातील सर्वांगीण स्वच्छता, सुंदरता व पर्यावरणपूरक वातावरण ठेवण्यासाठी नगर परिषदेने या स्पर्धेत भाग घेण्यास आमंत्रित केले आहे. शहरातील ज्या ...

Hygiene related competitions for women | महिलांसाठी स्वच्छता संबंधित स्पर्धा

महिलांसाठी स्वच्छता संबंधित स्पर्धा

Next

शहरातील सर्वांगीण स्वच्छता, सुंदरता व पर्यावरणपूरक वातावरण ठेवण्यासाठी नगर परिषदेने या स्पर्धेत भाग घेण्यास आमंत्रित केले आहे. शहरातील ज्या महिला ओला कचरा, सुका कचरा, घरगुती घातक कचरा वर्गीकृत करून घंटागाडीत देईन. त्यांची निवड करून त्यांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येईल. याकरिता प्रथम क्रमांकाचे बक्षीस फ्रीज, तर दुसरे वाॅशिंग मशीन व तिसरे कुलर ‌‌‌ठेवण्यात आले आहे. याव्यतिरिक्त प्रत्येक प्रभागातील एका महिला विजेत्याला पैठणी साडी दिली जाणार आहे. स्पर्धेचा कालावधी १५ जानेवारी ते ३१ मार्च २०२१ पर्यंत राहील. यासाठी नियम व अटी आहेत. स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी घंटागाडी ड्रायव्हर जवळून स्पर्धा नोंदणी फॉर्म घेऊन दररोज वर्गीकृत कचरा देऊन ड्रायव्हरची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. सहभागी घरांनी ओला, सुका व घरगुती घातक कचरा वर्गीकृत करून घंटागाडीत टाकणे आवश्यक आहे. सहभागी घरांमध्ये होम कम्पोस्टिंग करणे गरजेचे आहे. कालावधी संपल्यावर तो फॉर्म आरोग्य विभाग, नगर परिषद, रिसोड येथे जमा करावा लागेल. त्या फॉर्मच्या आधारावरच विजेत्याची निवड करण्यात येईल. एकापेक्षा जास्त विजेते ठरल्यास लकी ड्रॉद्वारे विजेत्याची निवड करण्यात येईल. नियम व अटींमध्ये बदल करण्याचा अधिकार फक्त नगर परिषदेला आहे. या स्पर्धेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी केले.

या स्पर्धेमागील उद्देश महिलांना प्रोत्साहित करणे, त्यांना सन्मानित करणे आहे. घर परिसरातील स्वच्छतेत महिलांचा मोलाचा वाटा असतो. महिलांनी या स्पर्धेत जास्तीत जास्त संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष विजयमाला कृष्णा आसनकर यांनी केले.

Web Title: Hygiene related competitions for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.